Beed crime news
Beed crime news saam tv

Beed : मंदिराच्या पुजारी पदावरून भावकीत वाद; हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दिराच्या पुजारी पदावरून पुजारी असणाऱ्या चुलत भावात वाद झाला. त्यानंतर भर बैठकीमध्ये सध्याचे मंदिराचे पुजारी असणाऱ्या व्यक्तींकडून एकाकुटुंबातील महिलेसह मुलाला कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली आहे.

बीड : बीडच्या (Beed) गेवराईचं आराध्य दैवत असणाऱ्या त्वरिता देवी मंदिरातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिराच्या पुजारी पदावरून पुजारी असणाऱ्या चुलत भावात वाद झाला. त्यानंतर भर बैठकीमध्ये सध्याचे मंदिराचे पुजारी असणाऱ्या व्यक्तींकडून एकाकुटुंबातील महिलेसह मुलाला कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत महिला आणि मुलगा जखमी झाले आहेत. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ( Beed Crime News In Marathi )

Beed crime news
मेंढ्यांना धुवायला गेले अन् काळाने घातला घाला, दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

गेवराईचं आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्वरिता देवी मंदिरात, छबुबाई रायते या पुजारी म्हणून होत्या. मात्र, त्यांचं निधन झाल्यानंतर कोर्टाच्या वारसानुसार हेमनदास रायते हे पुजारी झाले. मात्र आता हे हेमनदास देखील मयत झाले आहेत. त्यामुळे त्यांचा मुलगा भक्तीदास रायते हे वारसा प्रमाणे मला पुजारी म्हणून काम करण्यास परवानगी द्यावी. 'एक वर्ष मी करेल दुसऱ्या वर्षी तुम्ही करा ' अशी मागणी केली. मात्र, सध्या त्यांचे भावकीतील चुलत भाऊ पुजारी म्हणून काम पाहत असून त्यांनी याला नकार दिला. त्यामुळे भक्तीदास रायते यांनी धर्मादाय कार्यालयकडे धाव घेतली. त्यानंतर धर्मादाय कार्यालयातून त्वरिता देवीच्या सर्व ट्रस्टींना नोटीस जारी करण्यात आली.

या नोटीसीच्या अनुषंगाने मंदिरात (Temple) ग्रामस्थांसह एक बैठक बोलवण्यात आली होती. या दरम्यान भर बैठकीत सध्याचे पुजारी असणाऱ्या व्यक्तींसह कुटुंबातील महिलांनी पीडित रायते कुटुंबातील महिलेसह मुलाला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आहे. यामध्ये पीडित माया रायते यांचा हात देखील मोडल्याचा सांगण्यात येत आहे. तर या सर्व मारहाणीच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Beed crime news
सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला अखेर जामीन मंजूर

मात्र, या प्रकरणात तलवाडा पोलिसांनी पीडित महिलेची फिर्याद न घेता तिच्या मुलाची तक्रार घेतली आणि जाणीवपूर्वक पीडितेचं म्हणणं मांडू न दिल्याचा आरोप देखील पीडित माया रायते यांनी केला आहे. त्यामुळे आम्हाला न्याय द्या, अशी मागणी त्यांनी पोलीस (Police) अधिक्षकांकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. मात्र, पोलीस जाणीवपूर्वक माझी फिर्याद घेत नसल्याचा देखील आरोप जखमी माया रायते यांनी केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com