भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून 30 हजारांची लाच; सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता रंगेहाथ पकडला

संजयकुमार कोकणे असे लाचखोर कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे.
भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून 30 हजारांची लाच; सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता रंगेहाथ पकडला
Beed Sanjaykumar Kokane ArrestSaam Tv

बीड : केलेल्या विकासकामाची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी, 30 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास, लाच घेताना बीड एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. सदरील कारवाई बीडच्या अंबाजोगाई येथील कार्यालयात करण्यात आली आहे. संजयकुमार कोकणे असे लाचखोर कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. (Beed Latest Crime News)

Beed Sanjaykumar Kokane Arrest
Eknath Shinde LIVE updates: ..तर मुख्यमंत्रिपद अन् शिवसेना पक्षप्रमुखपदही सोडण्यास तयार: उद्धव ठाकरे

गेल्या काही महिन्यांपासून कोकणे हे अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी कार्यरत आहेत. त्यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत निधीतून केलेल्या कामांची प्रलंबित देयके करण्यासाठी, 30 हजार रुपयांची लाच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्याकडे मागितली होती. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीचा सापळा रचून बीडच्या पथकाने लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांना रंगेहाथ पकडले आहे.

Beed Sanjaykumar Kokane Arrest
रस्‍ता ओलांडताना कंटेनरची धडक; एकाचा मृत्‍यू, अपघातानंतर महामार्गावर रास्ता रोको

दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी लाचखोर संजयकुमार कोकणे यांनी, जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहित बंदुकीची मागणी केली होती. गुत्तेदार, कॉन्ट्रॅक्टर बोगस बिलांसाठी चाकू दाखवत धमकी देत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता. आणि त्यामुळेच बंदूक द्यावी अशी मागणी कोकणे यांनी जिल्हाधिकार्‍यांना केल्याने एकच खळबळ उडाली होती. तर आता बंदुकीची मागणी करणारे खुद्द संजयकुमार कोकणे हे स्वतःहा एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com