Beed News: भूक भागवा म्हणत चालकानेच काढली महिलेची छेड; धावत्या बसमधील धक्‍कादायक प्रकार

भूक भागवा म्हणत चालकानेच काढली महिलेची छेड; धावत्‍या ट्रॅव्‍हलमधील धक्‍कादायक प्रकार
Beed Crime News
Beed Crime NewsSaam tv

बीड : ट्रॅव्हल्समध्ये कुटुंबातील महिलांना पाठवत असाल तर सावधान.. असं म्हणण्याची वेळ सध्या आली आहे. धावत्या ट्रॅव्हल्समध्ये महिलेची (Beed News) छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माझी भूक भागवा असं म्हणत ट्रॅव्हल्स चालकाने प्रवासी महिलेची छेडछाड केली आहे. ही संतापघटना गंगाखेड (Pune) पुणे चालणाऱ्या स्वराज ट्रॅव्हल्समध्ये घडली आहे. (Tajya Batmya)

Beed Crime News
Bribe Trap: आदिवासी आश्रम शाळेतील मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

पोलीस सूत्रांकडून मिळलेल्या माहितीवरून परळी येथील पीडिता ही सध्या भोसरी (पुणे) येथे राहते. त्या २४ मे रोजी येरवडा पुणे ते (Parali) परळी वैजनाथ असा गंगाखेड पुणे- गंगाखेड चालणाऱ्या स्वराज ट्रॅव्हल्सने प्रवास करत होत्या. यादरम्यान आरोपी चालक दत्ता विठ्ठल मोहिते (रा. गंगाखेड) याने वाईट हेतुने फिर्यादीस ट्रॅव्हल्समध्‍ये पाठीमागे चला नाहीतर मी सीटवर येवु का? तुमचा पर्सनल मोबाईल नंबर मला द्या, तुम्ही मला खुप आवडतात असे म्हणाला.

Beed Crime News
Dhule Crime News: धुळे पुन्हा हदरले; गोळ्या झाडून चाक़ूने गळ्यावर वार करत हत्या

ट्रॅव्हल्स जेवणासाठी थांबली, चालकाने साधली संधी

दरम्‍यान प्रवासादरम्यान ट्रॅव्हल्स जेवणासाठी थांबली असता चालकाने पीडितेला ‘तुम्हाला जेवण खावु घालतो, तुम्ही माझी भुक भागवा'. असे म्हणत ट्रॅव्हल्स चालकाने पीडितेची छेड काढली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून परळी शहर (Police) पोलीस ठाण्यात आरोपी चालक दत्ता मोहिते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यामुळे ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com