Beed Crime News : मित्रानेच केला मित्राच्या बायकोवर बलात्कार; धक्कादायक घटनेनं बीड हादरलं!

बीडमध्ये एका नराधम मित्राने आपल्याच मित्राच्या बायकोवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
Beed Crime News
Beed Crime News Saam TV

Beed Crime News : देशभरासह राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये (Crime) दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिला अत्याचारविरोधी कायदा अंमलात आणावा अशी मागणी होत आहे. अशातच बीड (Beed) जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली. बीडमध्ये एका नराधम मित्राने आपल्याच मित्राच्या बायकोवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. (Beed News Today)

Beed Crime News
Mumbai : ११ वर्षीय मुलानेच रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव; कारण ऐकून पोलिसही चक्रावले!

फेसबुकवर फोटो टाकण्याची धमकी देत, एका नराधमाने मित्राच्या बायकोवर बलात्कार केला. ही संतापजनक घटना, बीडच्या धारूर (Dharur Taluka) तालुक्यातील एका गावात घडली. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Dharur Taluka News)

सचिन सीताराम वाव्हळ असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, 12 सप्टेंबर रोजी तालुक्यातील असोला येथील रस्त्याने जात असताना, पतीचा मित्र आरोपी सचिन वाव्हळ हा गाडी घेऊन आला. तुम्हाला सोडवून देतो असं म्हणत आरोपीने पीडितेला जबरदस्तीने गाडीत बसवलं. (Beed Dharur Crime News)

Beed Crime News
Mumbai : बॉयफ्रेंड देत होता लग्नास नकार; गर्लफ्रेंडने मागवलं ऑनलाईन विष अन्...

त्यानंतर आरोपीने पीडितेला बांगरवाडी परिसरात नेलं. पीडितेच्या गळ्यात हात टाकून आरोपीने फोटो देखील काढले. फोटो फेसबुकवर व्हायरल करतो, असं म्हणत आरोपीने पीडितेवर जबदस्तीने अत्याचार केला. या सर्व प्रकारानंतर पीडितेला जबर धक्का बसला.

घडलेली सर्व हकीकत पीडितेने आपल्या पतीला सांगितली. मित्रानेच घात केल्याचं लक्षात येताच पीडितेच्या पतीने पोलिसांत धाव घेतली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सचिन वाव्हळ याच्यावर धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com