Beed Crime: बायकोने भावाच्या मदतीने काढला नवऱ्याचा काटा; बीडच्या आडस गावातील भयानक घटना

Beed Crime News 5 June: या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Crime News
Crime NewsSaam TV

Beed Crime News Today: राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता बीडच्या आडस येथून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या भावाच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Crime News
Maharashtsra Political News : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अमित शाहांच्या भेटीला, रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची शक्यता

नेमकं प्रकरण काय?

आपल्या भावाच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या केज तालुक्यातील आडस गावात घडली आहे. पती दारु पिऊन दररोज त्रास देत असल्याने पती आणि पत्नीमध्ये रोज वाद होत होते. (Beed Crime)

त्यामुळे पत्नीने भावाच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढला. विकास अस खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत हा एका शेतात सालगडी म्हणून काम करत होता. तर याप्रकरणी मयताच्या आईच्या तक्रारीवरून, बीडच्या (Beed) धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Crime News
Anurag Thakur News : ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई होणार? केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्टच सांगितलं

पत्नी आणि तिचा भाऊ या दोघांविरोधात कलम 302, 504, 34 भा.द.वी. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गळा आवळल्याने विकासचा मृत्यू झाल्याचा अहवाल असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com