Crime News: बीड पुन्हा हादरले! सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना, भररस्त्यात 40 वर्षीय हॉटेल कामगाराची हत्या

बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. भररस्त्यात ४० वर्षीय व्यक्तीचा खुन करण्यात आला आहे.
beed Crime News
beed Crime NewsSaamTv

Beed News: बीड जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी काही दिवसांपासून चिंतेचा विषय ठरत आहे. काल( १९, जानेवारी) बीडच्या सांडरवन गावात खुनाची घटना घडली होती. या घटनेने खळबळ माजली असतानाच आज पुन्हा एकदा खुनाची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. (Beed News)

beed Crime News
Cotton Price: ८० टक्के जिनिंग बंद; भाव नसल्‍याने संकट, शेतकऱ्याच्या घरात कापूस

मिळालेल्या माहितीनुसार, सलग दुसऱ्या दिवशी बीडमध्ये खुनाची घटना उघडकीस आली आहे. आज ( २०, जानेवारी) शहरातील भर रस्त्यावर 40 वर्षीय हॉटेल कामगारांच्या खुनाची घटना घडली आहे. शहरातील धानोरा रोड परिसरात असणाऱ्या पालवन चौक परिसरात हा प्रकार घडला. दत्ता राधाकिशन इंगळे वय 40, रा. हिवरसिंगा ता. शिरुर कासार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

beed Crime News
Pankaja Munde: नाराजी नाट्यावर पंकजा मुंडेंचे मोठे वक्तव्य! फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाल्या; 'भाजपा पक्ष म्हणजे....'

मृत बीड शहरातील एका हॉटेल मध्ये काम करत होता. हा हत्येचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही. दरम्यान शिवाजी पोलीस ठाण्याचे पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com