चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून; आरोपी पतीचे आत्मसमर्पण

परंतु पती शेख याकूब शेख खुतबद्दीन वय 42 हा सतत मलिकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता.
चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून; 
आरोपी पतीचे आत्मसमर्पण
चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून; आरोपी पतीचे आत्मसमर्पणSaam tv

बीड: चारित्र्यावर संशय (Doubt over character) घेत गळा आवळून पत्नीचा खून (Wife's Murder) केल्याची धक्कादायक घटना, बीड शहरातील (Beed City) मासूम कॉलनी येथे रात्री 8 ते 10 च्या दरम्यान घडली आहे. शेख मलिका शेख याकूब वय 38 वर्ष असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांना तीन मुले आहे. परंतु पती शेख याकूब शेख खुतबद्दीन वय 42 हा सतत मलिकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

यातून त्यांचा रात्री वाद झाला. यावेळी याकूबने मलिकाचा गळा दाबून तिचा खून केला. घटनास्थळी पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विश्वास पाटील यांच्यासह टीमने धाव घेत मृतदेह ताब्यात घेत, शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. तर या घटनेला अंजाम देत, आरोपी पतीने स्वतः पेठ बीड पोलिस ठाण्यामध्ये आत्मसमर्पण केलं असून रात्री उशिरा याप्रकरणी आरोपी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेने बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com