Beed Online Fraud News: जम्मू- काश्मीरमध्ये बसून बीडच्या सिमेंट व्यापाऱ्याला लाखोंचा गंडा; सायबर पोलिसांकडून तिघांना अटक

Beed Ambajogai Online Fraud: सिमेंट खरेदीच्या व्यवहारात ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या जम्मू- काश्मीरमधील तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
Beed Ambajogai Online Fraud
Beed Ambajogai Online FraudSaamtv

Beed Cyber Fraud:

बीड सायबर पोलिसांनी परराज्यात जाऊन मोठी कारवाई केली आहे. सिमेंट खरेदीच्या व्यवहारात ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या जम्मू- काश्मीरमधील तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांची मोठी साखळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता असून अनेक गुन्हे देखील उघडकीस येणार आहेत. (Crime News In Marathi)

Beed Ambajogai Online Fraud
Samruddhi Mahamarg Accident News : समृद्धी महामार्गावरील अपघातात मध्यप्रदेशाच्या महिला पाेलीस अधिकारी गंभीर जखमी

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या अंबाजोगाई (Ambajogai) येथील सिमेंटचे होलसेल व्यापारी सिताराम तात्याराम माने यांनी 2022 मध्ये इंडिया मार्ट डॉटकॉमवर 520 अल्ट्राटेट सिमेंट बॅगची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना अज्ञात व्यक्तीने फोन करत मी अल्ट्राटेट कंपनीचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या ऑर्डरचे 500 बॅग प्रत्येकी 230 प्रमाणे जीएसटीसह 1 लाख 15 हजारांची पावती व्हॉट्सऍपवर पाठवली.

माने यांनी या कॉलला बळी पडून समोरच्या व्यक्तीने दिलेल्या खात्यावर त्यांनी दुकानाच्या नावे असलेल्या खात्यातून 1 लाख 15 हजार रुपये पाठवले. मात्र माने यांना सिमेंट प्राप्त झाले नाही. त्यांनी 7 ते 8 महिने ज्यांना पैसे पाठवले त्या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ना माल मिळाला ना त्यांना पैसे परत मिळाले.

त्यामुळं आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर माने यांनी बीड सायबर पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान बीड सायबर पोलिसांनी मोठ्या शिताफीने कसून तपास करत अखेर फसवणूक करणाऱ्या जम्मू काश्मीरमधील टोळीला जेरबंद केले.

पंकज चमनलाल मेहरा (वय 29) करणकुमार सुभाषकुमार (वय 28) आणि रामरंजनकुमार छोटेलाल (वय 30) अशी फसवणूक करणाऱ्या परप्रांतीय आरोपींची नावे असून हे सर्वजण जम्मू काश्मीरच्या कठुआचे रहिवासी आहेत. याआरोपींकडून अनेक गुन्हे देखील उघडकीस येणार आहेत. (Latest Marathi News)

Beed Ambajogai Online Fraud
Parliament Special Session : संसदेचं विशेष अधिवेशन नेमकं काय असतं? आजवरचा इतिहास काय?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com