बीड जिल्ह्यात पोलिसांचा वचक राहिला नाही-प्रीतम मुंडे

प्रीतम मुंडे म्हणाल्या की, एसपींची माझी भेट झाली, त्यांच्याशी चर्चा झाली, ते खूप सकारात्मक वाटले.
बीड जिल्ह्यात पोलिसांचा वचक राहिला नाही-प्रीतम मुंडे
Pritam MundeSaam TV

बीड: बीड जिल्ह्यातील (Beed District) कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी आज, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेतली आहे. यावेळी जिल्ह्यातील महिला आणि मुलींवरील होणार्‍या अत्याचाराविषयी, दिवसाढवळ्या तलवारीने होणाऱ्या मारहाणी विषयी, चोऱ्या, दरोडे यासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवून, खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी पंकज देशमुख यांच्याशी चर्चा केली. तर यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी पोलिस प्रशासनाच्या कामावरून खंत व्यक्त केली आहे.

प्रीतम मुंडे म्हणाल्या की, एसपींची माझी भेट झाली, त्यांच्याशी चर्चा झाली, ते खूप सकारात्मक वाटले. तरी दुर्दैवाने त्यांच्याकडे फक्त 8 दिवसांपर्यत जिल्ह्याचा चार्ज आहे. त्यांच्यासोबत विशेष करून महिला मुलींवरील अत्याचाराविषयी चर्चा झाली. त्याचबरोबर आज जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे.

सामूहिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत, ज्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. दिवसाढवळ्या लोकांचे खून पडत आहे, इथे एस पी ऑफीस समोर तलवारीने एकमेकांवर हल्ले होत आहेत, कलेक्टर ऑफिसमध्ये होणारे गोळीबार असतील, सातत्याने कुठे ना कुठे अशा घटना घडत आहेत. त्यामुळं आज जिल्ह्यात पोलिस प्रशासनाचा वचक नाही, असा मी लोकप्रतिनिधी म्हणून म्हणत आहे.

आणि पोलिसांनी तो वचक बसवला पाहिजे सत्ता कोणाची असेल सरकार कोणाचेही असेल, तरी पोलिसांनी आपले काम निःपक्षपातीपणे केलं तर कायदा सुव्यवस्था अबाधित राहील. अशी प्रतिक्रिया खासदार प्रीतम मुंडे यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मीडियाशी बोलताना दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.