कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा रुग्णालय अलर्ट!

लहान मुलांच्या कोविड वार्डाचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले उदघाटन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा रुग्णालय अलर्ट!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा रुग्णालय अलर्ट!SaamTvNews

बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा (Beed District) रुग्णालय प्रशासन अलर्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्हा रुग्णालयात लहान मुलांसाठी तपासणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहेत तर लहान मुलांसाठी स्वतंत्र वार्डाचे देखील आज जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.

हे देखील पहा :

तर, यावेळी शर्मा यांनी कोविड (Covid) वार्डाची देखील पहाणी केलीय. यादरम्यान वार्डात असलेली उपाययोजना अन सुविधा पाहून जिल्हाधिकारी शर्मा यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांचे कौतुक केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा रुग्णालय अलर्ट!
जॅक डॅनियल कॉटरची मागणी केल्याने ग्राहकास पोकळ बांबूचे फटके!

दरम्यान, जिल्हा रुग्णालय परिसरात जेवणासाठी तयार करण्यात आलेल्या एका मोठ्या हॉलमध्ये, आता कोरोना (Corona) सदृश्य रुग्णांसाठी सोय करण्यात आलीय. तर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे माझ्या यांच्या नियोजनातून जिल्ह्यातील आरोग्य सुविधा सुधारत असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांतून एक प्रकारचं समाधान व्यक्त केलं जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com