निसर्गसौंदर्यात भर, प्रसिद्ध सौताडा आणि कपिलधारा धबधबा ओसंडून वाहू लागले
निसर्गसौंदर्यात भर, प्रसिद्ध सौताडा आणि कपिलधारा धबधबा ओसंडून वाहू लागलेविनोद जिरे

निसर्गसौंदर्यात भर, प्रसिद्ध सौताडा आणि कपिलधारा धबधबा ओसंडून वाहू लागले

पावसाळ्याचे पावणेतीन महिने उलटल्यानंतर यंदा पहिल्यांदाचं वाहतोय सौताडा धबधबा..

बीड : पावसाळा rain सुरू होऊन जवळपास पावणे ३ महिने झाले. कोरडाठाक असणारा बीडच्या Beed सौताडा Sautada येथील धबधबा waterfall , २ दिवस झालेल्या मुसळधार पावसाने Heavy Rain आता ओसंडून वाहू लागला आहे. बीड जिल्ह्यातील सौताडा हे तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ Tourist destination म्हणून, ओळखले जाते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून, तसेच राज्याबाहेरून देखील पावसाळ्यात याठिकाणी निसर्गप्रेमी सहलीसाठी येत असतात.

हे देखील पहा-

मात्र, पावसाळ्याचे पावणे ३ महिने उलटून गेले आहे. तरी देखील या परिसरात पाऊस न झाल्याने, पर्यटन केंद्र असणाऱ्या सौताड्याचे मुख्य आकर्षण असणारा आणि 700 फुटवरून खोल दरीत पडणारा धबधबा कोरडाठाक होता. मात्र, बीड जिल्ह्यात २ दिवस झालेल्या मुसळधार पावसाने, यंदा पहिल्यांदाच हा धबधबा ओसंडून वाहत आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील निसर्गप्रेमींचा हिरमोड थांबणार असून, यामुळे जिल्ह्यातील निसर्गाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.

निसर्गसौंदर्यात भर, प्रसिद्ध सौताडा आणि कपिलधारा धबधबा ओसंडून वाहू लागले
Poladpur Waterfall | पोलादपूरचा हा धबधबा बघाचं !

दुसरीकडे बीडच्या निसर्ग सौंदर्यात भर टाकणारा कपिलधारा kapildhara येथील धबधबा देखील खळखळून वाहत आहेत. बीडपासून २० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पाली परिसरात कपिलधार हा धबधबा आहे. यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा हा धबधबा ओसंडून वाहत आहे. तब्बल ७० फूट उंचावरून हा धबधबा वाहू लागला आहे. यामुळे निसर्ग प्रेमींना हा धबधबा खुणावत असून, या दोन्ही धबधब्यांमुळे जिल्ह्याचे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलले आहे...!

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com