लिंगायत वीरशैव समाजाचे संत मन्मथस्वामी महाराजांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात!

देशभरातुन लाखो भाविकांची उपस्थिती...
लिंगायत वीरशैव समाजाचे संत मन्मथस्वामी महाराजांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात!
लिंगायत वीरशैव समाजाचे संत मन्मथस्वामी महाराजांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात!विनोद जिरे

बीड : देशातील लिंगायत वीरशैव समाजाचे संत मन्मथस्वामी महाराज, यांचे संजीवन समाधी स्थळ असणाऱ्या, बीडमधील श्रीक्षेत्र कपिलधार याठिकाणी या यात्रा उत्सवाला सुरुवात झालीय. यात देशभरातून लाखो भाविक भक्तांनी हजेरी लावली असून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे बंद असलेली यात्रा आणि दर्शन या वर्षी सुरू होत असल्याने भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद आणि उत्साह आहे.

या उत्सवामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील जवळपास दीडशे दिंड्या सहभागी झाल्या आहेत. यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली आहे. तसेच रंगरंगोटी रांगोळी, आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे परिसर उजळून निघाला आहे. भाविकांसाठी दर्शन रांगेची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

हे देखील पहा :

आज दुपारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शासकीय महापूजा संपन्न झाली असून कोरोणाचे सर्व नियम पाळून भाविकांची सुरक्षा लक्षात घेता आम्ही हा यात्रा उत्सव साजरा करत आहोत. असं देवस्थानचे विश्वस्थ व यात्रा पंच कमिटीचे सदस्य ऍड.शांतवीर गंगाधर आप्पा चौधरी यांनी सांगितले.

दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या संकटानंतर देशभरातून लिंगायत वीरशैव समाजाचे भाविक भक्त दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत. कोरोणाच्या पार्श्‍वभूमीवर याठिकाणी हॉटेल आणि स्टॉल लावण्यास परवानगी दिली नाही. तसेच विश्वस्त व यात्रा पंच कमिटीच्या वतीने भाविकांना खिचडी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तसेच प्रत्येकाला सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे वारंवार सांगितले जात आहे. असे देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष सोमनाथ हलगे यांनी सांगितलं

लिंगायत वीरशैव समाजाचे संत मन्मथस्वामी महाराजांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात!
Beed : अवैध गुटखा विक्री प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखाला अटक करा

यावर्षी मन्मथ माऊलीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये तरुण-तरुणींचे प्रमाण वाढले आहे. आम्ही यात्रा उत्सवामध्ये स्वच्छतेचे काम करतो. यवतमाळ मधून आम्ही चार दिवसापूर्वी निघालो होतो, आता पायी ज्योत घेऊन मनमत माऊलीच्या समाधीस्थळावर पोहचलो आहोत. दर्शन घेतल्यानंतर आनंद वाटत आहे, तसेच कोरोनानंतर पहिल्यांदाच हा यात्रा उत्सव होत असल्याने आनंद वाटत आहे. अस रामेश्वर बिच्चेछवार यांनी सांगितलं.

दरवर्षी आम्ही मन्मथ माऊलीच्या दर्शनासाठी येत असतो, मागच्या दोन वर्षात कोरोना मुळे आम्हाला दर्शनासाठी येता आले नव्हते. मात्र या वर्षी यात्रा सुरू झाल्यामुळे आनंद वाटत आहे. दर्शन झाल्यामुळे मन प्रसन्न झालेलं असून खूप आनंद वाटतो, असे भाविक कविता लड्डे यांनी सांगितले.

लिंगायत वीरशैव समाजाचे संत मन्मथस्वामी महाराजांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात!
पुणे सहकार विभाग महिला अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल !

मागच्या वर्षी कोरोनामुळे यात्रा झाली नाही. मात्र यावर्षी युवकांमध्ये आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद आहे. यावर्षी पंच समितीतर्फे महाप्रसादाचे आयोजन केले आहे आणि या वर्षीची संख्याही भरपूर आहे. या नियमानुसार उपाय योजना मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. आतापर्यंत 70 ते 80 हजार भाविकांनी दर्शन घेतले आहे. येणाऱ्या लोकांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे. असे प्रसाद मिटकरी यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com