
बीड : बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या मनुरवाडी गावातील ग्रामस्थ, वादग्रस्त आणि कामचुकार शिक्षकांच्या बदलीसाठी आक्रमक झाले आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन आणि शिक्षण विभागाने दखल न घेतल्याने, संतप्त ग्रामस्थांनी चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप ठोकले आहे. यावेळी शिक्षक शाळेच्या गेटच्या आतमध्ये तर विद्यार्थी गेटच्या बाहेर आहेत. तर संतप्त पालकांनी शाळेच्या बाहेरच आपल्या पाल्यांची शाळा भरवली आहे. (Beed Latest Marathi News)
माजलगाव तालुक्यात असणाऱ्या मनुरवाडी येथील, कामचुकार आणि वादग्रस्त ठरलेल्या शिक्षकाच्या बदलीसाठी, गावकरी आज संतप्त झाले आहेत. या शिक्षकांच्या बदलीसाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नाही. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप ठोकले आहे.
शिक्षक शाळेत वेळेवर येत नाही, मुलांना शिकवत नाहीत, सतत गैरहजर असतात म्हणत ग्रामस्थ आक्रमक झालेत. ग्रामस्थांनी शाळेच्या गेटला कुलूप ठोकले असून शिक्षक हे गेटच्या आतमध्ये असून गेटच्या बाहेरच पालकांनी विद्यार्थ्यांची शाळा भरवलीय. दरम्यान वादग्रस्त शिक्षकांची बदली होत नाही तोपर्यंत शाळेचं कुलूप उघडू देणार नाही, असा संतप्त इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.