Beed News: कोरडा दुष्काळ जाहीर करा, अन्यथा अजित पवारांची सभा उधळून लावू; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनसे आक्रमक

Beed News: बीडच्या अंबाजोगाईत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा,अशी मागणी मनसेने केली आहे.
Beed News
Beed NewsSaam tv

Beed News: बीडच्या अंबाजोगाईत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना पीक विमा जाहीर करा, हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत करा, अशी मागणी घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बीडच्या अंबाजोगाई शहरातील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, 27 तारखेच्या अजित पवारांच्या सभेच्यापूर्वी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अन्यथा अजित पवारांचे 27 तारखेच्या सभेत घुसू आणि राडा करत सभा उधळून लावू, असा थेट इशारा देखील मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी दिला आहे.

Beed News
Anil Deshmukh News: अनिल देशमुखांचा भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले, "समझोतासाठी नकार दिला आणि दुसऱ्याच दिवशी रेड पडली..."

बीड जिल्ह्यात एका महिन्यापासून पाऊस नाही. यामुळे शेतकऱ्यांची उभी पीकं करपू लागले आहेत. मात्र कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना याचं काहीच देणे घेणे नाही. उलट शरद पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी 27 तारखेला अजित पवारांची सभा ठेवली आहे, असे धस म्हणाले.

'अजित पवारांच्या सभेची तयारी आता कृषीमंत्री करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या 27 तारखेपूर्वी बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाख रुपयाची मदत जाहीर करा अन्यथा सभा उधळून लावू, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष सुमन धस यांनी दिला आहे.

Beed News
Vijaykumar Gavit Speech : भाजप नेते विजयकुमार गावितांचा अजब दावा; ऐश्वर्या रायचा उल्लेख करत म्हणाले...

दरम्यान, एकीकडे शरद पवाराच्या सभेनंतर अजित पवारांची सभा होत आहे. यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या वादात आता मनसेने उडी घेतल्याचे दिसून येत आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण अधिकचं आपल्याच दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com