Beed Nagar Panchayat Election Results: सत्ताधारी कमी पडले, नागरिकांची पहिली पसंती भाजपला - पंकजा मुंडे

नगरपंचायत निवडणुकांमध्ये सत्ताधारी कमी पडले आहेत. बीडमध्ये लोकांनी भाजपला पहिली पसंती दिली आहे, असं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.
Beed Nagar Panchayat Election
Beed Nagar Panchayat ElectionSaam TV

बीड: नगरपंचायत निवडणुकांमध्ये सत्ताधारी कमी पडले आहेत. बीडमध्ये लोकांनी भाजपला पहिली पसंती दिली आहे, असं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. राज्यातही नागरिकांनी भाजपला साथ दिली आहे. बीडमध्ये ज्या नगरपंचायतीच्या निवडणुकी होत्या त्या सर्व नगरपंचायतीत भाजपला बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे मी सर्व कार्यकर्त्यांचं, जनतेचे आभार मानते आणि अभिनंदनही करते. तसेच, सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करते, असंही त्या म्हणाल्या (Beed Nagar Panchayat Election Results Pankaja Munde Says People Choose BJP).

Beed Nagar Panchayat Election
औरंगाबाद: सोयगावात शिवसेनेचे वर्चस्व, अब्दुल सत्तारांनी राखला गड

"बीडमधली लढत ही पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे नव्हती. बीड (Beed) मध्ये जो निकाल लागला आहे तो गेल्या अडीच वर्षांपासूनच्या कामकाजावरील लोकांचा राग-रोष आणि आमच्या काळातील कामावरील विश्वासामुळे आहे. त्यामुळे भविष्यातील निवडणुका कशा असतील याचं चित्र बीड जिल्ह्यातील लोकांनी दाखवलं आहे", असं पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या.

"बीडमध्ये भाजप सोडून एकसंघ असा कुठलाही पक्ष नाही. आमदारांचा एक एक मतदार संघाचा ठेका आहे. त्यापलीकडे ते कुठल्याही जिल्ह्याच्या भविष्यासाठी हस्तक्षेप करत नाही. हेच पालकमंत्रीही करतात. जिल्ह्याचा सर्वांगिन विकास, जिल्ह्याचा कार्यकर्ता असा विचार करणारा नेता बीडमध्ये नाही. त्यामुळे हा निकाल आलाय", असा टोलाही त्यांनी लगावला.

"मुळात भाजप ही विरोधात नाही. जनतेने भाजपला सत्ता स्थापनेचा जनादेश दिला. भाजप या राजकारणामुळे विरोधी पक्ष म्हणून आहे", असंही त्यांनी सांगितलं.

Beed Nagar Panchayat Election
Nagar Panchayat Elections 2022 Result: नारायण राणेंच्या बालेकिल्यात सेनेस ७ जागा

जिल्ह्यातील 5 नगरपंचायतमधील 85 जागांसाठी निवडणूक, कोणाला किती जागा?

आष्टी नगरपंचायत

भाजप - 13

राष्ट्रवादी - 02

काँग्रेस - 01

अपक्ष - 01

एकूण - 17

शिरूर कासार नगरपंचायत

भाजप - 11

राष्ट्रवादी - 04

शिवसेना - 02

एकूण - 17

वडवणी नगरपंचायत

भाजप - 08

राष्ट्रवादी - 06

राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडी - 03

एकूण - 17

केज नगरपंचायत

राष्ट्रवादी - शेकाप - 05

काँग्रेस - 03

जनविकास आघाडी - 08

अपक्ष - 01

एकूण - 17

पाटोदा नगरपंचायत

भाजप - 09

भाजप पुरस्कृत - 06

महावि - 02

एकूण - 17

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com