परळीत ३८ वर्षीय महिलेवर तरुणाकडून अत्‍याचार; नोकरीचे दिले आमिष
अत्‍याचार

परळीत ३८ वर्षीय महिलेवर तरुणाकडून अत्‍याचार; नोकरीचे दिले आमिष

परळीत ३८ वर्षीय महिलेवर तरुणाकडून अत्‍याचार; नोकरीचे दिले आमिष

बीड : परळीमध्ये पुन्हा एका महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणाने नोकरीला लावतो, रूम बघून देतो; असे सांगत सोलापूरच्या एका ३८ वर्षीय महिलेला पुण्याहून परळीला आणत बलात्कार केला. महिलेच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. (beed-news-38-year-old-woman-tortured-by-youth-in-Parli)

अत्‍याचार
अन्‌ महिला परीक्षार्थीच्‍या गेटवरून उड्या..

अंबाजोगाईमधील बलात्कार प्रकरण ताजे असतानाच पुन्हा धनंजय मुंडेंच्या परळीत परजिल्ह्यातील महिलेवर बलात्कार झाल्याने खळबळ उडाली आहे. गणेश बाबुअप्पा कोडी (वय 24, रा. जंगम गल्ली, गणेशपार, परळी वैजनाथ) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

जीवे मारण्याची धमकी

संशयीत आरोपी गणेशने सोलापूर येथील रहिवासी असलेल्या ३८ वर्षीय महिलेला "तुला परळी येथे नोकरी लावतो असे अमिष दाखवून पुण्याहून परळीला आणले. यावेळी परळीत आल्यानंतर रूम बघून देतो म्हणून १९ आणि २० नोव्हेंबरला बळजबरीने इच्छेविरुद्ध बलात्कार केला. त्यांनतर कोणास सांगितल्यास तुला परळीच्या बाहेरही जाऊ देणार नाही, तसेच इथेच मारुन टाकीन, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान पीडित महिलेच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com