Heavy Rain: आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; एक तासात 65 मिली पावसाची नोंद

आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; एक तासात 65 मिली पावसाची नोंद
Beed Heavy Rain
Beed Heavy RainSaam tv

बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील सराटेवडगाव, आनंदवाडी परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. यामुळे नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. या मुसळधार पावसाने आनंदवाडी परिसरातील पूल वाहून गेला आहे. तर पिकांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. (Beed Heavy Rain)

Beed Heavy Rain
Lumpy Virus: नंदुरबार जिल्ह्यातील 18 गावांमध्ये लम्‍पीचा अहवाल पॉझिटिव्ह; पाच किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित

बीडमधील (Beed) आष्‍टी तालुक्‍यात मुसळधार पाऊस झाला. तासाभरात ६५ मिली (Rain) पावसाची नोंद झाल्‍याने ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्‍याचे चित्र पहावयास मिळत आहे. या पावसामुळे गावला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय.

पिकांचे नुकसान

दुसरीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरिप पिके उडीद, मुग, कापूस, तूर हे पिके पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी गावकऱ्यांनी केलीय. तसेच गावाला जोडणारा पूल वाहून गेल्याने तात्काळ पूल दुरुस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com