संपत्ती हडपण्यासाठी भावाने काढले जिवंत तहसीलदार बहिणीचे खोटे मृत्यु प्रमाणपत्र!

एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशा धक्कादायक प्रकाराने राज्यात खळबळ; २००४ साली मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र!
संपत्ती हडपण्यासाठी भावाने काढले जिवंत तहसीलदार बहिणीचे खोटे मृत्यु प्रमाणपत्र!
संपत्ती हडपण्यासाठी भावाने काढले जिवंत तहसीलदार बहिणीचे खोटे मृत्यु प्रमाणपत्र!SaamTvNews

बीड : एखाद्या सिनेमालाही लाजवेल असा एक धक्कादायक प्रकार, बीड जिल्ह्यात समोर आलाय. जिवंत असलेल्या नायब तहसीलदार महिलेस मयत दाखवून चक्क तिचे मृत्यु प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकचं खळबळ उडाली आहे. कौटूंबिक कलहातून, भावाने जिवंत नायब तहसीलदार असणाऱ्या बहिणीचे मृत्यू प्रमाणपत्र काढले आहे. तर हा अजब प्रकार कारभार चाळीसगावच्या (Chalisgaon) नगरपालिकेने केला असून संपत्तीचा वाद सुरू झाल्यानं, हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Beed Bogus Death Certificate Of Nayab Tehsildar Of Chalisgaon)

हे देखील पहा :

बीडच्या (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलच्या उपयुक्तांचे एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांना आले. त्यात केज येथे कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार, आशा दयाराम वाघ यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून अहवाल सादर करण्यात यावा, असा मजकूर या पत्रात आहे. तसेच आशा दयाराम वाघ यांनी 2004 सालीच मरण पावलेलेल्या व्यक्तीची बोगस प्रमाणपत्र (Bogus Death Certificate) वापरून, एमपीएससी (MPSC) आणि महसूल विभागाला फसवत असल्याची तक्रार मधुकर दयाराम वाघ यांनी थेट महसुल सचिव, महसूल उपायुक्त यांना केली होती. या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र या नंतर बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

संपत्ती हडपण्यासाठी भावाने काढले जिवंत तहसीलदार बहिणीचे खोटे मृत्यु प्रमाणपत्र!
नागपुरात युवा सेनेचा ‘निश्चय मेळावा’; संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न

बीडच्या केज (Kej) तहसीलमध्ये महसूल - 2 मध्ये नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या व गेल्या दहा वर्षांपासून बीड जिल्ह्यात नोकरी करणाऱ्या, आशा दयाराम वाघ यांचे मृत्युपत्र समोर आले आहे. मात्र, जिवंत नायब तहसीलदारांच मृत्युपत्र समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. यासंदर्भात नायब तहसीलदार आशा वाघ यांना विचारले असता मृत्यु प्रमाणपत्र पाहिल्यानंतर मला धक्काच बसलाय. मी जिवंत असताना आणि शासनाचा पगार घेऊन नोकरी करत असताना, अशा पद्धतीने मृत्यु प्रमाणपत्र शासकीय संस्था नगरपालिका कशी देऊ शकते? याचे आश्चर्य वाटत असल्याचे आशा म्हणाल्या.

आता मला जिवंत असल्याचा पुरावा द्यावा लागेल. तसेच नगरपालिकेसारख्या संस्थेने अशा पद्धतीने प्रमाणपत्र देणे चुकीचे आहे. यामुळे मला खूप मानसिक ताण होत आहे. असं नायब तहसीलदार आशा वाघ यांनी सांगितले. तर कौटुंबिक कलहातून सख्खा भाऊ असं करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. चाळीसगाव नगरपालिकेत माझ्यासारख्या नायब तहसीलदार पदावर काम करणाऱ्या अधिकार्‍याचे जिवंत असताना मृत्यू प्रमाणपत्र तयार केले जात असेल, त्या ठिकाणी इतर किती व्यक्तींचे मृत्यु प्रमाणपत्र तयार केले गेले असतील? जन्म आणि मृत्यूची नोंद घेताना कागदपत्रांची पडताळणी केली जाते का? हे मी आता पाहणार आहे. यासंदर्भात तक्रार देखील करणार आहे. मात्र, आता माझ्यासमोर मी हयात असल्याचे प्रमाणपत्र देण्याचा, खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. असं आशा वाघ यांनी सांगितलं.

संपत्ती हडपण्यासाठी भावाने काढले जिवंत तहसीलदार बहिणीचे खोटे मृत्यु प्रमाणपत्र!
"ईडी जिसकी मम्मी हैं वो सरकार निकम्मी हैं" प्रणिती शिंदेंनी दिला केंद्राविरुद्ध नारा

मधुकर दयाराम वाघ हे माझे भाऊ आहेत. आमचा कौटुंबिक जमिनीचा वाद सुरु आहे. त्यातूनच त्यांनी हा प्रकार केलाय. असं आशा वाघ यांनी सांगितलं. तसेच मी कुठलेही बोगस प्रमाणपत्र आणि कोणाचेही बोगस प्रमाणपत्र वापरले नाहीत. माझे त्यांनी बनावट मृत्यु प्रमाणपत्र तयार केले आहे. मृत्यु प्रमाणपत्रामधील आशा वाघ आणि जिवंत आशा वाघ एकच आहे. फक्त जाणीपूर्वक मला मानसिक त्रास देण्याच्या हेतूने, असे कृत्य केले जात असल्याचं अशा वाघ यांनी म्हटलंय.

संपत्ती हडपण्यासाठी भावाने काढले जिवंत तहसीलदार बहिणीचे खोटे मृत्यु प्रमाणपत्र!
Accident News: पुसद- अमरावती बसला अपघात; एक ठार, १७ जखमी

दरम्यान, चाळीसगाव लगत असणाऱ्या डोणदिगर गावातील वाघ कुटुंबातील जमिनीच्या वादात बहिण-भाऊ आमने सामने आले आहेत. चक्क जिवंत बहिणीचे 18 वर्षांपूर्वीचे मृत्यू प्रमाणपत्र काढून प्रशासनाला दाखवणारा भाऊ आणि मी जिवंत आहे असे सांगणारी बहीण, यामुळे नात्याला देखील संपत्तीचा रंग लागल्याचे चित्र निर्माण झालं आहे. दरम्यान संपत्तीपायी चक्क नायब तहसीलदार बहीण मयत आहे हे दाखविण्याचे धाडस, विचार करायला लावणारे आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीअंती काय निष्पन्न होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com