तर मनसेची भुमिका योग्‍य समजू; धनंजय मुंडे

तर मनसेची भुमिका योग्‍य समजू; धनंजय मुंडे
तर मनसेची भुमिका योग्‍य समजू; धनंजय मुंडे
Dhananjay MundeSaam tv

बीड : दोन वर्षाच्‍या कोरोना संकटानंतर सर्वत्र बेरोजगारी वाढली आहे. यामुळे भोंग्यापेक्षा बेरोजगारांचा प्रश्न महत्वाचा आहे. भोंगे लावणे अन्‌ काढण्याने आजच्या तरुणांना भाकर मिळणार आहे का? महाराष्‍ट्र प्रगतीकडे वाटचाल करेल का? भोंग्याच्या प्रश्नांने महाराष्ट्र आणखीन प्रगत होणार असेल तर त्यांची भूमिका योग्य असल्‍याचे समजूया; असा खोचक टोला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मनसेला लगावला आहे. (beed news bhonga matter mns Dhananjay Munde statement)

Dhananjay Munde
अवैध सावकारी; चौघे चार मेपर्यंत कोठडीत

राज्‍यात भोंग्‍याच्‍या विषयावरून राजकारण तापले आहे. महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याबाबत भोंगे काढण्याचा विषय लावून धरला आहे. या विषयावर माध्‍यमांशी बोलताना मंत्री मुंडे यांनी आपली भुमिका मांडत मनसेवर निशाणा साधला आहे.

जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्‍न

मनसेने भोंगे काढण्याचा विषय लावून धरला आहे. अशा भुमिकेतून दोन जातीत तेढ निर्माण करण्याचे काम मनसे करीत असून महाराष्‍ट्रात कायदा सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण केला जात असल्‍याचा आरोप देखील मुंडे यांनी केला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात जे घडले नाही; ते घडवायचा प्रयत्न सुरू आहे. शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी कधीच जातपात मानले नाहीत. यामुळे कोण किती जातीवादी आहे हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या. यााकरीता एकदा समोरासमोर बसू असे आव्‍हान देखील धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंना केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.