
बीड : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा बालविवाहने डोकं वर काढले आहे. दहावी वर्गात शिक्षण घेत असणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह (Child Marriage) आज तिच्या परीक्षेच्या दिवशीच लावण्यात आला. हा धक्कादायक प्रकार बीडच्या (Beed News) परळी तालुक्यातील नंदागौळ गावात उघडकीस आला आहे. तर याप्रकरणी (Parali) परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल १८३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Breaking Marathi News)
पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीवरून परळी तालुक्यातील नंदागौळ येथील एका १६ वर्षीय मुलीचा गावालगत असणाऱ्या चोपणवाडी येथील तरुणाशी आज दुपारी बालविवाह झाला. सदर मुलगी इयत्ता दहावीत शिकत असुन तिचा आज गणित विषयाचा पेपर सोमेश्वर विद्यालय घाटनांदुर येथे होता. मात्र ती पेपरला गैरहजर होती. त्याचवेळेत तिचा बालविवाह झाला.
१८३ जणांवर गुन्हा दाखल
परळी येथे झालेल्या बालविवाह प्रकरणी आता मुला– मुलीच्या आई- वडीलांसह मामा- मामी, भटजी, फोटोग्राफर, मंडपवाला, आचार्यावर आणि नंदागौळसह चोपणवाडी लग्नाला असणाऱ्या तब्बल १८३ जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.