Beed News: ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादावरून दोन गटात हाणामारी; ग्रामस्थ मागताय गाव सोडून जाण्याची परवानगी

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादावरून दोन गटात हाणामारी; ग्रामस्थ मागताय गाव सोडून जाण्याची परवानगी
Beed News
Beed NewsSaam tv

बीड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या शुल्लक वादावरून बीडच्या म्हाळसजवळा गावात दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात (Shiv Sena) शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे स्वतः गावातील विरोधकाला काठीने मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्या मारहाणीचा (Beed News) व्‍हीडिओ पोलिसांकडे देत आम्हाला न्याय द्या; अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Maharashtra News)

Beed News
Jalgaon News: गोणपाटात आढळले महिलेची साडी, बांगड्या अन्‌ हाडांचा सांगाडा

म्हाळसजवळा (जि. बीड) या गावातील व्हिडियोमध्ये जिल्हा प्रमूख कुंडलिक यांच्या हातात काठी आहे. ते स्वतः काठीने मारताना दिसत आहेत. तसेच गावांमध्ये त्यांच्या समर्थकाच्या हातामध्ये काठी, तलवारी देखील भांडणात वापरल्याचे गावांतील नागरिकांनी सांगितले. काठी घेवून मारहाण करतांना कुंडलिक खांडे यांनाही मारहाण झाली. तर या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मारहाणीत तिन ते चार जन जखमी झाले आहेत.

गावकरी मागताय गाव सोडायची परवानगी

जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी मी एकनाथ शिंदेंचा माणूस आहे. माझं कोणीच काही वाकड करू शकत नाही. असं म्हणून गावात दहशत माजवली आहे. तलवारी आणि काट्याकुराडी यामुळे मारहाण केल्याने गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हात जोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा. अशी मागणी माळस जवळा गावातील नागरिकांनी केली आहे. एकतर कुंडलीक खांडे यांना गावात राहू द्या. अन्यथा आम्हाला गाव सोडून जाण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी देखील गावकऱ्यांनी केली

मारहाण केलेल्या आरोपात तथ्य नाही ः खांडे

लग्नामध्ये गोंधळ घालण्यावरून या वादाला सुरुवात झाली. तो वाद मिटवण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी वाद सोडवताना थोडी बाचाबाची झाली. मात्र दोघांनाही शांत केले यात मी मारहाण केलेल्या आरोपात तथ्य नाही. दारू पिलेल्या मुलाला गावातील लोक मारत होते ते सोडण्यासाठी मी गेलो असल्‍याचे कुंडलिक खांडे यांनी सांगितले. तर गावातील प्रकार व त्यातील व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. गावात दहशत निर्माण करणाऱ्या सर्वावर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल. अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com