Crime News: अमानुषतेचा कळस! कामावर येत नसल्याने मुकादमाची बेदम मारहाण; ऊसतोड मजुराचा दुर्देवी मृत्यू

ऊसतोड कामगार आजारी असल्याने काम करू शकत नव्हते, त्यामुळेच त्याला जबर मारहाण करण्यात आली...
Sugarcane factory
Sugarcane factorySaam TV

विनोद जरे..

Beed News: आजारी असलेल्या मजुराला कामवर का येत नाही म्हणत मुकादमाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील सोन्नाथडी येथे उघडकीस आली आहे. या मारहाणीत ऊस तोड कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला. श्रीराम आण्णासाहेब कसबे असं मयत ऊसतोड कामगाराचे नाव आहे. याबाबतची तक्रार मृत ऊसतोड कामगाराच्या पत्नीने धारुर पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

Sugarcane factory
Pankaja Munde: 'आता निवडणुका घ्याचं...' पंकजा मुंडेंनी आवळली वज्रमूठ; थेट देवेंद्र फडणवीसांवर साधला निशाणा

याबाबत मृत उसतोड कामगाराच्या तक्रारीनुसार, माजलगाव तालुक्यातील सोन्नथडी येथील ऊसतोड कामगार श्रीराम आण्णासाहेब कसबे हे आजारी असल्याने काम करू शकत नव्हते. मात्र 16 मार्च रोजी मुकादम अशोक कसबे व ट्रक मालक गंगाधर तिडके यांनी त्यांना दुसऱ्या ट्रकमध्ये भोगलवाडी येथे घेऊन गेले. यावेळी त्यांनी श्रीराम कबसेंना जबर मारहाण केली. या मारहाणीत श्रीराम कसबे हे गंभीर जखमी झाले. ज्यामध्ये त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

Sugarcane factory
Admapur News: 'गर्वाने वागू नका! भारत-पाक युद्ध होईल, चालता बोलता मरण येईल, राज्य गुंडांचे येईल...' बाळूमामांच्या भंडाऱ्यात भाकणूक

याबाबतची तक्रार कामगाराच्या पत्नीने धारुर पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पंढरपूरमध्ये उसतोड कामगारांना पैशासाठी डांबून ठेवल्याचीा घटना समोर आली होती, ज्यानंतर आता या घटनेने ऊसतोड कामगारांवर होणाऱ्या अन्यायाचा मुद्दा चिंतेचा विषय ठरत आहे.. (Beed News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com