दुर्देवी! पोहायला गेलेल्या डॉक्टरला पाण्यातच लागला दम; मित्रांसमोरच गमावला जीव

डॉक्टर आपल्या मित्रांसोबत आज माजलगावच्या धरणावर पोहण्यासाठी गेले होते.
Beed News
Beed Newsविनोद जिरे

बीड: मित्रांसोबत धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा दम लागल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बीडच्या (Beed) माजलगाव लगत असणाऱ्या केसापुरी कॅम्प परिसरातील धरणावर घडली आहे. पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव दत्ता फपाळ असं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. दत्ता फपाळ हे माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथील रहिवासी आहेत. ते आपल्या मित्रांसोबत आज माजलगावच्या धरणावर पोहण्यासाठी गेले होते मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने पोहतांना त्यांना दम लागला आणि डॉ. फपाळ पाण्यात बुडाले.

Beed News
भरवस्तीमधील घरात सापडली जनावरांची ५३ शिर; पोलिसांच्या छाप्यात समोर आली धक्कादायक माहिती

त्यांच्यासोबत पोहायला गेलेल्या मित्रांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही आणि मित्रांत्या डोळ्यांदेखत डॉक्टर पाण्यात बुडाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच माजलगावच्या तहसीलदार आणि पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत.पाणी जास्त असल्याने शोध घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे NDRF च्या पथकाला पाचारण करण्यात आले असून अद्याप शोध सुरू आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com