Rain Update: बीडच्या धारूर परिसरात जोरदार पाऊस; दोन गावांचा संपर्क तुटला

बीडच्या धारूर परिसरात जोरदार पाऊस; दोन गावांचा संपर्क तुटला
Beed Heavy Rain
Beed Heavy RainSaam tv

बीड : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर बीडच्या धारूर तालुक्यात पावसाने तुफान बॅटिंग केली. धारूर तालुक्यातील आसरडोह, रुई धारूर, अंजनगाव यासह अनेक गाव परिसरात जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली. यामुळे रुई धारूर ते अंजनगाव रस्त्या दरम्यानच्या नदीवरील पूल पाण्याखाली गेला. (Beed News Rain Update)

Beed Heavy Rain
सरासरी बिलाच्‍या नावाने अवाजवी बिल; शेतकऱ्याला ५५ हजाराचे बिल

मागील आठ–दहा दिवसांपासून (Rain) पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु, राज्‍यात ४ ऑगस्‍टपासून पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. शिवाय पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. त्‍यानुसार बीड (Beed) जिल्‍ह्यातील काही भागात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. यात नदी, नाल्‍यांना पुर आला आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात अद्यापही सर्वदूर पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प निम्म्यापेक्षा कमी क्षमतेवर आहेत.

दोन गावांना संपर्क तुटला

अचानक आलेल्या पुरामुळे रहदारी करत असलेल्‍या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. या दरम्यान पुराच्या पाण्यातून वृद्ध व्यक्तींसह परिसरातील ग्रामस्थ ये जा करत आहे. यामुळे एखादी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीला आलेल्‍या पुरामुळे दोन गावांचा संपर्क तुटला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com