Beed News: दुर्दैवी घटना..पती- पत्नीचा हिटरचा शॉक लागून मृत्यू

दुर्दैवी घटना..पती- पत्नीचा हिटरचा शॉक लागून मृत्यू
Beed News
Beed NewsSaam tv

बीड : सकाळी आंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी हिटर लावलेले होते. याच हिटरला चिटकून पती– पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना (Beed) बीडच्या केज (Kej) तालुक्यातील पिंपळगाव येथे घडली. ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे व सिंधूबाई ज्ञानेश्वर सुरवसे अशी मयत पती पत्नीचे नावे आहेत. (Letest Marathi News)

Beed News
Amaravati News: खांबावर दुरूस्‍ती करताना लागला शॉक; वरिष्‍ठ विज तंत्रज्ञाचा मृत्‍यू

बीडच्‍या पिंपळगाव येथे सुरवसे दाम्पत्य वास्‍तव्‍यास होते. सर्वसामान्य कुटुंबातील असल्‍याने आपली उपजीविका भागवण्यासाठी ते फिरत्‍या हॉटेलचा व्यवसाय करायचे. त्याच्यातून येणाऱ्या उत्पन्नातून आपली उपजीविका भागवायचे. गेल्या अनेक वर्षापासून हा पारंपारिक असलेला धंदा पुढे चालवत अनेक ठिकाणच्या बाजारात जाऊन ते हॉटेल व्यवसाय करायचे. त्यामुळे हा त्यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय त्यांनी चालू ठेवला होता.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

सकाळी उठल्‍यावर आंघोळीला गरम पाण्यासाठी हिटर लावले होते. पाणी तापल्‍याने सिंधूबाई या हिटर काढायला गेल्‍या. यावेळी त्‍यांना करंट लावून त्‍या पाण्याच्‍या संपर्कामुळे चिकटल्‍या. हे पाहून पती ज्ञानेश्‍वर हे वाचविण्यासाठी गेले. पत्‍नीला खेचण्यासाठी धरले असता ते देखील चिकटले. यात पती– पत्‍नीचा मृत्‍यू झाला. या दुर्दैवी घटनेने सुरवसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com