Beed News: माझी सर्व जमीन बिनशर्त तुमच्या नावावर करतो..., बीडच्या शेतकऱ्याचं थेट पंतप्रधान मोदींना चॅलेन्ज

Beed Farmer's Challenge To PM: साहेब आधी अतिवृष्टीने सर्व गेलं आणि आता गारपिटीने राहिलेलं हिरावलं. आता आम्ही जगायचं कसं? असं म्हणत या शेतकऱ्याने मदतीची मागणी केली आहे.
Farmer's Challenge To PM Modi
Farmer's Challenge To PM Modi saam tv

>> विनोद जिरे, बीड

Farmer's Challenge To PM Modi : मोदी साहेब तुम्ही आम्हाला चार महिन्यात 2 हजार देता, या 2 हजारात तुम्ही एक दिवस दौरा करून दाखवा. मी माझी सर्व जमीन तुमच्या नावावर करतो, असं आव्हान बीडच्या शेतकऱ्यानं थेट पंतप्रधान मोदींना केले आहे. साहेब आधी अतिवृष्टीने सर्व गेलं आणि आता गारपिटीने राहिलेलं हिरावलं. आता आम्ही जगायचं कसं? असं म्हणत या शेतकऱ्याने मदतीची मागणी केली आहे. यावेळी शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले.

आधी अतिवृष्टीने सगळं हिरावून नेलं आणि आता तीन दिवसापासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतातील उभी पिकं उध्वस्त झाली त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे बीडमधील अशोक ढेकळे या शेतकऱ्याने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

Farmer's Challenge To PM Modi
Viral News: महिलेने मुलाच्या मित्रासोबतच थाटला संसार! घरी येत-जात असताना जुळले प्रेमसंबंध

बीडच्या टिप्पतवाडी येथील अशोक ठेकळे यांच्याकडे अडीच एक्कर शेती आहेत. या शेतीत त्यांनी ज्वारीचे पीक घेतले आहे. मात्र शनिवारी झालेल्या गारपीटीने ज्वारीचं पीक पूर्णपणे मातीमोल झालं. या ज्वारीसोबत शेतकऱ्यांच्या स्वप्नांची देखील माती झाली आहे. त्यामुळे जगावं कसं? असा प्रश्न शेतकरी अशोक ढेकळे विचारला आहे. (Beed News)

'शेतातील मालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, कापूस घरात पडून आहे, वेचणीसाठी 13 रुपये प्रति किलो भाव द्यावा लागला अशा परिस्थितीत कुटुंब कसं चालणार? सरकारचे हे धोरणचं शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे', असा गंभीर आरोप अशोक ढेकळे यांनी केला आहे.

Farmer's Challenge To PM Modi
IND vs AUS 2nd ODI : मिशेल स्टार्कने टीम इंडियाचं कंबरडं मोडलं, दुसऱ्या वनडेत भारत 117 वर ऑलआऊट!

अशोक ढेकळे म्हणाले, सरकार केवळ घोषणा करतंय, नरेंद्र मोदी चार महिन्याला फक्त दोन हजार रुपये टाकतात. हे दोन हजार रुपये कसे पुरणार? साधा किराणा देखील या दोन हजार रुपयात येत नाही. मग आम्ही जगायचं कसं? मायबाप सरकारने शेतकऱ्यांचा विचार करावा', असे ते म्हणाले. (Latest Marathi News)

तसेच थेट पंतप्रधानांना आव्हान देताना ढेकळे म्हणाले, 'माझं नरेंद्र मोदींना आव्हान आहे, तुम्ही आम्हाला चार महिन्यात दोन हजार रुपये देता, या दोन हजार रुपयात तुम्ही तुमचा एक दिवसाचा दौरा करून दाखवा. तुम्हाला हा दौरा करता आला, तर मी माझी सर्व जमीन बिनशर्त तुमच्या नावावर करून टाकतो". ही व्यथा मांडताना अशोक ढेकळे यांना अश्रू अनावर झाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com