
विनोद जिरे, बीड
Beed Latest News : बीडमध्ये (Beed) एका मजूराचा रुग्णालयाच्या गेटवरच दुर्दैवी मृत्यू (Laborer Died) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बीडच्या मादळमोही गावात घडली आहे. या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर नसल्यामुळे उपचाराअभावी या परप्रांतीय मजूराला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. रोशनलाल हंसराज चित्ते (50 वर्षे) असं या मजूराचे नाव आहे. तो पंजाब राज्यातील रहिवासी असून बीडमध्ये जिनिंग मजूर म्हणून काम करत होता.
रोशनलाल चित्ते हे मादळमोही परिसरात असणाऱ्या सारडा जिनिंगवर मजूरी काम करत होते. त्यांनी दिवसभर जिनिंगमध्ये काम केले. मात्र कामावरून सुट्टी झाल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्याला तात्काळ जिनिंगमधील उपस्थित कामगारांनी मादळमोहीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. यादरम्यान त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.
या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. त्यामुळे रोशनलाल हे अत्यवस्थ अवस्थेतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारात डॉक्टरची वाट पहात पडून होते. पण तब्बल एक तास होऊ देखील डॉक्टर न आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारातच त्यानी तडफडत प्राण सोडले. दांडी बहाद्दर डॉक्टरांमुळे उपचाराअभावी रोशनलाल यांचा मृत्यू झाला.
रोशनलाल यांच्या उपचारासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अरुण लोकरे यांना फोनवरून संपर्क साधण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी 'मी आंघोळ करतोय थोड्या वेळात कॉल करतो', असे उत्तर देऊन फोन ठेवला. पण त्यानंतर एक तासाने फोन केल्यानंतर त्यांनी फोन उचलला नाही. या घटनेमुळे मादळमोही ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक नाही तर दोन डॉक्टर असूनही परिसरातील ग्रामस्थांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत.
या दांडीबहाद्दर डॉक्टरांमुळे गेल्या काही महिन्यांपूर्वी एका महिलेची डिलिव्हरी आरोग्य केंद्राच्या दारातच झाली होती. त्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा मन हेलावणारी घटना घडली असून उपचारा अभावी एका परप्रांतीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे या आरोग्य विभागातील कामचुकार डॉक्टरांवर केवळ नोटीस देऊन थातूरमातूर कारवाई करण्यापेक्षा कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.