H3N2 Virus
H3N2 VirusSaam tv

H3N2 Virus: जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती

H3N2 चा धोका; जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती

बीड : बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर H3N2 चे संशयित रुग्ण आढळले. यानंतर बीडचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. H3N2 चा धोका (Beed News) ओळखून जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

H3N2 Virus
Nandurbar Corona Update: जिल्ह्यात पुन्‍हा कोरोनाचा धोका; सापडले ५ कोरोना पॉझिटीव्‍ह

देशात H3N2 चे संक्रमण वाढत आहे. राज्‍यातील अनेक जिल्‍ह्यांमध्‍ये H3N2 चे रूग्‍ण आढळून येत आहेत. यामुळे राज्‍याची आरोग्‍य यंत्रणा देखील अलर्ट झालेली आहे. याच अनुषंगाने बीड जिल्‍ह्यात देखील आरोग्‍य यंत्रणा अलर्ट झाली आहे. जिल्‍ह्यात अद्याप रूग्‍ण आढळून आले नसले तरी संक्रमण रोखण्यासाठी यंत्रण सज्‍ज झाली आहे.

स्वॅब कलेक्ट केंद्र सुरू

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी आजपासून जिल्हा रुग्णालयात H3N2 च्या संशयित रुग्णांसाठी स्वॅब कलेक्ट केंद्र सुरू केले आहे. तर याच पार्श्वभूमीवर डॉ. साबळे यांनी जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर अन्‌ कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती केली आहे. दरम्यान कोरोनाचे आणि स्वॅब H3N2चे लक्षण जवळपास सारखेच आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com