Beed: महावितरणचा नगरपालिकेला दणका; थकीत विजबीलापोटी विजपुरवठा खंडीत

महावितरणचा नगरपालिकेला दणका; थकीत विजबीलापोटी विजपुरवठा खंडीत
Beed News
Beed NewsSaam tv

बीड : बीड नगरपालिका इमारतीचे विद्युत बिल थकल्याने महावितरणने नगरपालिका प्रशासनाला चांगलाच दणका दिला. महावितरणने (MSEDCL) नगरपालिकेच्या इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. दोन दिवसांपूर्वी हा विद्युत खंडित करण्यात आल्‍याने याचा त्रास शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. (Beed News Corporation Pending Light Bill)

Beed News
Crime: पत्‍नीने पतीला जीवे मारले; डोके आपटून आत्‍महत्‍या केल्‍याचा बनाव

एकीकडे शहरातून (Beed News) लाखोंची वसूली होत असताना दुसरीकडे वीज बील भरण्यापोटी पैसा नसल्याचे कारण नगरपालिका समोर करते. यामुळे वीज कंपनी थेट नगरपालिकेचा विद्युत पुरवठा तोडते; ही एकप्रकारे नगर पालिकेवर आलेली नामुष्की म्हणावी लागेल. लाईट नसल्याने सर्वर डाऊन होत आहे. त्यामुळे नगरपाकिकेतील अनेक कॉम्प्युटरवर होणारे कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे पालिकेमध्ये आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.

दोन लाख थकीत

याविषयी नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांना फोन करून विचारले असता, ते म्हणाले की मी बाहेर आहे. महावितरणचे पालिकेकडे जवळपास दोन लाख रुपये वीज बिल थकीत होते. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी वीज पुरवठा खंडित केला. मात्र महावितरणला आम्ही चेक दिला आहे. त्यामुळे वीज पुरवठा अखंडित करण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. असं उमेश ढाकणे म्हणाले. तर पालिकाचे प्रशासक असणाऱ्या उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांना संपर्क साधला असता, त्यांनी मीटिंगचं कारण देत फोन घेतला नाही.

प्रशासकाकडून दुर्लक्ष

दरम्यान शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर नगर पालिकांवर प्रशासक नेमण्यात आले. मात्र याच प्रशासकांच्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांना समस्येचा सामना करावा लागतोय.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com