मुंडे समर्थक पुन्हा आक्रमक; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा दोन वेळा अडवला ताफा

मुंडे समर्थक पुन्हा आक्रमक; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा दोन वेळा अडवला ताफा
मुंडे समर्थक पुन्हा आक्रमक; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा दोन वेळा अडवला ताफा
Beed NewsSaam tv

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची संधी न दिल्याने मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. आज सकाळी पारगाव तर दुपारी बीड शहरातील बार्शी रोडवरील धांडेनगर परिसरात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यादरम्यान मुंडे समर्थकांवर गाडी घालण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलाय. (beed pankaja Munde supporters aggressive and Praveen Darekar was twice stopped)

Beed News
ऑनलाईन कर्जाच्या नावे फसवणुक

प्रवीण दरेकर हे बीड (Beed) जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पुढे निघत असताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) समर्थकांनी दरेकर आणि फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी गाडी न रोखल्याने पंकजा मुंडे समर्थक थेट गाड्यासमोर आडवे झाले. त्यामुळे मुंडे समर्थकांसह एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.

पंकजा मुंडेंच्‍या भुमिकेकडे लक्ष

भाजपकडून (BJP) मुंडे बाहिणींवर अन्याय होतोय. यापूर्वी खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. तर आता पंकजा मुंडे यांचा विधान परिषदेतून पत्ता कट करण्यात आला. त्यामुळे आता पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com