RTO Scam: परराज्यातील चोरीच्या वाहनांची पुनर्नोंदणी; बीड आरटीओ कार्यालयात नवा घोटाळा

परराज्यातील चोरीच्या वाहनांची पुनर्नोंदणी; बीड आरटीओ कार्यालयात नवा घोटाळा
Beed News RTO Scam
Beed News RTO ScamSaam tv

बीड : बीडच्या उपप्रदेशिक परिवहन कार्यालयाचा वाहन नोंदणीचा नवा मोठा घोटाळा उघडकीस (Beed News) आला आहे. परराज्यातून चोरी केलेल्या १९ अवजड वाहनांची बनावट नोंदणी केल्याचा (RTO) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सर्व वाहनाची किंमत ३ कोटीच्या घरात आहे. यात मूळ दस्तऐवज नष्ट केल्याचे उघड झाले आहे. (Breaking Marathi News)

Beed News RTO Scam
Nandurbar News: ग्रामपंचायतीसमोरच हातभट्टयांची केली होळी; महिला बचत गट आक्रमक

तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी हा सर्व प्रकार केल्याचे उघड झाले असून या प्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परराज्यातील चोरीच्या वाहनांची बनावट कागदपत्र तयार करुन नोंदणी करणारे मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा पोलिसांना संशय आहे. यात आरटीओ कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असल्याने याची व्याप्ती मोठी आहे.

तत्‍कालिन अधिकारीवर गुन्‍हा

बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तत्कालीन अधिकाऱ्याचा बनावट वाहन पुनर्नोंदणीचा नवा घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. परराज्यातील तब्बल १९ वाहनांची बनावट नोंदणी करून अभिलेखे नष्ट केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. याबाबत बीड ग्रामीण ठाण्यात तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन अधिकारी नकाते यांची यापूर्वी औरंगाबादेतही वादग्रस्त कारकीर्द राहिलेली आहे. बनावट नोंदणी करणाऱ्या रॅकेटशी त्यांचे संबंध पुन्हा एकदा उघड झाले आहेत. ते सध्या परभणी येथे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत.

Beed News RTO Scam
Accident News: कारचा अपघात; मदतीसाठी धावले तर धक्‍कादायक सत्‍य आले समोर

तक्रारीत काय म्हटलंय?

उपप्रादेशिक कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १ जुलै ते ३० नोव्हेंबर २०२० या कालावधीत नकाते यांनी परराज्यातील बनावट किंवा चोरीच्या वाहनांची बनावट चेसिस क्रमांक व कागदपत्रांआधारे बेकायदेशीररीत्या पुनर्नोंदणी केली. त्यानंतर या वाहनांचे मूळ दस्तऐवज गायब केले.

विशेष म्हणजे वाहनांच्या पुनर्नोंदणीच्या कामाचे वेगवेगळे टप्पे असून त्यात तपासणी, परवानगी व नंतर नोंदणी केली जाते. मात्र, लिपिक, वाहन निरीक्षक व नोंदणी अधिकाऱ्याचे कामही तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नकाते यांनी स्वतःच केल्याचे उघड झाले आहे. १९ पैकी १६ वाहनांवर कर्ज आहे. तर या १६ वाहनांना ९ फायनान्स कंपन्यांनी कर्ज पुरवठा केलेला आहे. कर्जाची रक्कम तीन कोटींच्या घरात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com