Beed News: कोरोना काळात कर्जाचे हप्‍ते थकले; वसुलीसाठी तगादा, कंटाळून मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल

कोरोना काळात कर्जाचे हप्‍ते थकले; वसुलीसाठी तगादा, कंटाळून मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल
Beed News
Beed NewsSaam tv

बीड : कर्ज मागणीच्या हप्त्याच्या तगाद्याला कंटाळून जिल्हा परिषद शाळेच्या (ZP School) मुख्याध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना (Beed) बीडच्या धारूर तालुक्यातील आसरडोह शिवारात घडली आहे. नितीन लक्ष्मण पाटोळे (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. (Maharashtra News)

Beed News
Nandurbar News: हौसेला मोल नाही; लग्न लावण्यापूर्वी नव वर– वधूला हेलिकॉप्टरची सफर

मुख्याध्यापक नितीन पाटोळे यांनी बीडच्या माजलगाव येथील मंगलनाथ मल्टीस्टेटच्या दिंद्रूड शाखेकडून २०१९ मध्‍ये वैयक्तिक कर्ज घेतले होते. सुरूवातीला १० हजार रुपये हप्त्याने कर्जाची परतफेड केली. मात्र कोरोना काळात काही हप्ते थकले. त्यानंतर जून २०२२ रोजीपासून १५ हजार रुपये हप्ता ते भरत होते. तरी देखील मंगलनाथ मल्टीस्टेटचे वसूली पथकातील अधिकाऱ्यांनी कर्जफेडीसाठी तगादा लावला होता. त्यांना सातत्याने त्रास देऊन कारवाईची धमकी देत होते. यामुळे पाटोळे व्यथित होते. यातूनच कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

परिवार पडला उघड्यावर

घटनेची माहिती मिळताच धारूर पोलीसांनी घटनास्थळी दाखल घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान नितीन पाटोळे यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार असून त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. पाटोळे यांच्‍या टोकाच्‍या भुमिकेमुळे परिवार उघड्यावर पडला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com