जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग; ५८ गावांना पुराचा संभाव्य धोका

जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग; ५८ गावांना पुराचा संभाव्य धोका
Jayakwadi Dam
Jayakwadi DamSaam tv

बीड : पैठणचे जायकवाडी धरण ९० टक्‍के पेक्षा जास्त क्षमतेने भरल्याने धरणाचे १८ दरवाजे उघडले आहे. यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्‍याने (Godavari River) गोदावरी नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यांना पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय ५८ गावांना पुराचा संभाव्‍य धोका वर्तविला जात आहे. (Beed News Jayakwadi Dam)

बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव तालुक्यातून ही गोदावरी नदी वाहत असल्यामुळे, गेवराई, माजलगावसह जालना (Jalna) जिल्ह्यातील पाथरवाला परिसरात देखील पुराचा संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान गेवराई तालुक्यातील 32 गावांना तर माजलगाव (Jayakwadi Dam) तालुक्यातील जवळपास 26 गावांना पाण्याच्या विसर्गात वाढ झाली तर पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे गावकऱ्यांनी नदीपात्रात उतरू नये; असे आवाहन गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह माजलगावच्या तहसीलदार वर्षा मनाळे यांनी केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com