Beed: चिखलमय रस्त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष; सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून बनवला रस्ता

जाधव यांनी स्वखर्चातून रस्ता बनवत स्थानिकांना आधार दिला आहे.
Beed News
Beed NewsSaam Tv

बीड - चिखलमय रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना, टायगर ग्रुपने आधार दिला आहे. रस्त्यासाठी अनेक वेळा नगर पालिका आणि ग्रामपंचायतला निवेदने दिली, मात्र कसलीही दखल घेतली गेली नाही. मात्र नागरिकांची गरज लक्षात घेऊन टायगर ग्रुपचे (Tiger Group) जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी स्वखर्चातून रस्ता करत नागरिकांना काहीसा आधार दिला आहे.

हे देखील पाहा -

बीडच्या (Beed) एमआयडीसी भागातील बहिरवाडी परिसरात नागरिकांना चिखलमय रस्त्याच्या सामना करावा लागत होता. अनेक वेळा नगर पालिकेला निवेदने दिली. बहिरवाडी ग्रामपंचायतला निवेदने दिली, मात्र याची कोणतीचं घेतली गेली नाही. त्यामुळं स्थानिक नागरिकांनी आपले गऱ्हाणे अविनाश जाधव यांच्याकडे मांडले. त्यामुळं जाधव यांनी स्वखर्चातून रस्ता करत स्थानिकांना आधार दिला आहे.

Beed News
Latur News: उदगीर तालुक्यात दोन बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल

दरम्यान याविषयी सामाजिक कार्यकर्ते तथा टायगर ग्रुपचे बीड जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले की काही दिवसांपूर्वी माझ्याकडे या परिसरातील महिला आल्या आणि म्हणाल्या, भाऊ आमचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा.

केवळ रस्ता नसल्यामुळे माझ्या मुलीला मी डिलिव्हरीसाठी घरी आणलं नाही. त्यामुळे आमच्या रस्त्याचा प्रश्न तुम्ही मार्गी लावा. यामुळे मी मित्र परिवाराच्या मदतीने स्वखर्चातून रस्ता केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com