
बीड : बीड कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल ३५ वर्षानंतर सत्तांतर (Beed) झाले. या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Bajar Samiti) सरला मुळे या नवनिर्वाचित महिला सभापतींच्या नावाने महिलाराज आले आहे. (Tajya Batmya)
दरम्यान आतापर्यंत बीड जिल्ह्यातील बीड, आष्टी, माजलगाव, केज, पाटोदा या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. तर उर्वरित परळी, अंबाजोगाई, गेवराई, वडवणी या ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडी पुढील तीन दिवसात होणार आहेत.
३५ वर्षानंतर सत्तांतर
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यामध्ये या एक आगळीवेगळी निवडणुक झाली आहे. कारण या कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेली ३५ वर्षापासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची सत्ता होती. या सत्तेला सुरूंग लावत पुतण्या संदीप क्षीरसागर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, उध्दव ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, शिवसंग्राम पक्षाच्या ज्योती मेटे यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची ३५ वर्षाची सत्ता मोडत काढून सर्वपक्षीय कृषी उत्पन्न बाजार समिती केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.