Grampanchayat Election: बीड जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध

बीड जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionSaam tv

बीड : जिल्ह्यात ग्रामपंचायतीचा धुरळा उडाल्याचा पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील (Beed News) होऊ घातलेल्या 704 ग्रामपंचायतच्या (Gram Panchayat) निवडणुकीपैकी 37 ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. बुधवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर हे चित्र स्पष्ट झाले आहे. (Letest Marathi News)

Gram Panchayat Election
Gujarat Election 2022 : गुजरात, हिमाचलमध्ये कुणाची सत्ता? आज होणार फैसला, AAP इतिहास घडवणार?

जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतींच्या (Election News) निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान आहे. यावेळी सरपंच निवड थेट जनतेतून आहे. त्यामुळे चुरस तर वाढलीच आहे. शिवाय इच्छुकांच्या संख्येतही भर पडली. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या दरम्यान सदस्य पदांसाठी 19 हजार 784 तर सरपंचपदासाठी 4 हजार 255 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. 6 डिसेंबरला छाननी प्रक्रिया पार पडली.

२२० अर्ज बाद

सरपंच व सदस्यपदाचे 220 अर्ज बाद झाले असून एकूण 23 हजार 468 अर्ज वैध ठरले आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 7 डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. यामध्ये 37 ठिकाणच्या ग्रामपंचायतचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com