Beed News: भजन करत अडविला बीड– अहमदनगर रस्ता; कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

भजन करत अडविला बीड– अहमदनगर रस्ता; कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक
Beed News
Beed NewsSaam tv

बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगावमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. (Beed) बीड -अहमदनगर महामार्ग आडवत शेतकऱ्यांनी (farmer) भजन करत रस्ता रोको केला. (Live Marathi News)

Beed News
Beed Unseasonal Rain : केज तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून शाळकरी मुलगा ठार; एक जखमी

कांदा उत्‍पादक शेतकरीला भाव मिळालेला नाही. यातच कांदा पीक अनुदान मिळण्यासाठी सात– बारा पिक पेऱ्याची जाचक अट लावली आहे. ही अट रद्द करण्यात यावी. यासाठी हा रस्ता रोको करण्यात आला. यात महिला शेतकऱ्यांचा देखील मोठा सहभाग होता. शेतकऱ्यांनी रस्‍त्‍यावर बसत भजन गात रास्‍ता रोको केला. यामुळे दोन्‍ही बाजूंची वाहतूक थप्‍प झाली होती.

Beed News
MSRTC Bus: डिझेल संपले, बस जागेवरच उभ्‍या; प्रवाशी बसले प्रतिक्षेत

दरम्यान आपल्याकडील मोबाईल दाखवत या मोबाईलवरून आम्ही नोंद कशी करायची. आता तुम्हीच सांगा जवळपास १०० टक्के शेतकरी हे अडाणी आहेत. मात्र पावतीवर तुम्हाला कळत नाही का? हा शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा आहे म्हणून? असा सणसणीत सवाल करत तात्काळ पिक पेऱ्याची अट रद्द करा. अशी मागणी आंदोलनात सहभागी झालेल्या वृद्ध महिला शेतकऱ्यांनी केली आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com