Beed News : 'त्या' प्रकरणी फडणवीसांसोबत मुख्यमंत्री शिंदेची चौकशी करा; सुषमा अंधारे यांची मागणी

Sushma Andhere Tweet : 'ते' मित्र कोण फडणवीसांनी नावे जाहीर करावीत - सुषमा अंधारे
sushma andhare
sushma andhare saam tv

Sushma Andhere News : उद्धव ठाकरे यांच्यासोबत जयसिंघानी यांचा फोटो भाजपने ट्विट केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी मात्र याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. कारण ज्यावेळी जयसिंघाणी हे उद्धव ठाकरे यांना भेटायला आले होते, त्यावेळी त्यांच्या उल्हासनगर भागातून आले होते. त्यांचे अध्यक्ष हे एकनाथ शिंदे होते आणि मातोश्रीमध्ये जर एखाद्या शिवसैनिकाला उद्धव ठाकरे यांची भेट त्यावेळी घ्यावी लागत असेल तर त्यावेळी जोपर्यंत जिल्हाध्यक्षांचा कन्फर्मेशन नसेल तोपर्यंत त्यांना प्रवेश मिळत नव्हता. (Latest Marathi News)

sushma andhare
Lalbaug Crime News: 'ती' मालिका पाहिली अन् आईचे तुकडे...; त्या कृत्याबद्दल मुलीनेच केला धक्कदायक खुलासा

याचा अर्थ एकनाथ शिंदे यांनीच जयसिंघानी यांची उद्धव ठाकरे यांच्या सोबत भेट घालून दिली होती का ? याची पण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्या बीडच्या (Beed) अंबाजोगाई येथे बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, की ज्यावेळेस अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली, त्यावेळी नैतिक जबाबदारी म्हणून देशमुख यांनी राजीनामा दिला होता. आता दस्तूर खुद्द गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या विषयीचं प्रकरण आहे. त्यामुळे त्यांनी देखील आता नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.

sushma andhare
‘अरं लेका दमानं...!’ कार्तिकला Bhool Bhulaiyaa 2 मधील ‘ती’ सिग्नेचर स्टेप करणं भोवलं, सेटवर डॉक्टर आले आणि...

तीन-चार खाते आहेत, एक खात सोडलं म्हणून काय झालं ? एवढी सत्ताकांक्षा बरी नव्हे. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना टोला देखील लगावला आहे. त्याचबरोबर जर फडणवीसांनी राजीनामा दिला तर या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी होईल. त्यामुळं त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी देखील मागणी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यामध्ये काही मित्र देखील सहभागी आहेत. त्यामुळे ते मित्र कोण ? त्यांचे नावे जाहीर करावीत. अशी मागणी देखील यावेळी सुषमा अंधारे यांनी केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com