Inter caste Love Marriage: आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या शेतकरी दांपत्याचा संशयास्पद मृत्यू, बीडमधील धक्कादायक घटना

आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या शेतकरी दांपत्याचा संशयास्पद मृत्यू
Inter Caste Love Marriage
Inter Caste Love MarriageSaam Tv

Beed News: आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या शेतकरी दांपत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर अली आहे. या दोघांनीही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. ही धक्कादायक घटना बीडच्या वाघळूज गावात घडली आहे.

ईश्वर गुंड वय 30 आणि ऋतुजा ईश्वर गुंड (वय 25 रा. वाघळूज ता. आष्टी जिल्हा बीड), असं आत्महत्या केलेल्या दांपत्याचे नाव आहे. विशेष म्हणजे या दांपत्यांना 6 महिन्याचे बाळ देखील आहे.

Inter Caste Love Marriage
Parliament Building Inauguration: नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार, राष्ट्रवादीसह 'या' पक्षांनी दर्शवला विरोध

मिळालेल्या माहितीनुसार, दोघे पती-पत्नी शेतामध्ये काम करण्यासाठी गेले होते. मात्र त्यानंतर ते घरी परतलेच नाही. ही बाब उशिरा लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी शोधाशोध केली असता रात्री ईश्वर गुंड याचा मृतदेह शेतामध्ये आढळून आला. (Latest Marathi News)

त्यानंतर सकाळी ईश्वरच्या पत्नीचा मृतदेह त्याच शेतामध्ये आढळून आला. प्राथमिक माहितीवरून दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केलीय. मात्र त्यांनी आत्महत्या का केली? हे अद्याप अस्पष्ट आहे. (Beed News)

दरम्यान, अंभोरा पोलिसांनी या दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून अधिक तपासणीसाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. अंभोरा पोलीस पुढील तपास करत आहेत. (Viral Video News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com