मृतदेह शोधण्यासाठी NDRF चा जवान धरणात उतरला अन् नशिबाने केला घात; केवळ ऑक्सिजन सिलिंडरच आला वर

माजलगाव धरणात बुडालेल्या डॉक्टरचा मृतदेह शोधतांना, कोल्हापूर येथील एनडीआरएफच्या जवानाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू.
Beed Doctor News
Beed Doctor Newsविनोद जिरे

बीड: मित्रांसोबत धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांना दम लागल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना, बीडच्या (Beed) माजलगाव लगत असणाऱ्या केसापुरी कॅम्प परिसरातील धरणावर घडली होती.

घटनेच्या २४ तासानंतरही बचाव पथकाला डॉक्टर फपाळ यांचा मृतदेह मिळालेला नाहीच. मात्र, या बचावकार्यादरम्यान आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. मृतदेहाचा शोध घेत असताना एनडीआरएफच्या (NDRF) कोल्हापूर येथील बचाव पथकातील कर्मचारी राजू मोरे हे मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात अडकले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पाहा व्हिडीओ -

मिळालेल्या माहितीनुसार, बचावकार्य करत असताना ते ऑक्सिजन सिलिंडरसह (Oxygen Cylinder) पाण्यात उतरले होते. मात्र, मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात ते अडकल्याने त्यांना ओढून बाहेर काढत असताना त्यांचा ऑक्सिजन सिलिंडर निसटून वर आला. मात्र, मोरे हे पाण्याखालीच राहिले. तर दुसऱ्या एका बुडालेल्या कर्मचाऱ्याला मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आलं असून त्यांच्यावर माजलगावच्या देशपांडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Beed Doctor News
Raj Thackeray| ...तर अंगावर येईल; मराठी, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे पुन्हा गरजले!

माजलगाव धरणात डॉ.फपाळ यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बीड, परळी , येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत होते. आज त्यांच्या मदतीला कोल्हापूर येथील एनडीआरएफची टीम धावून आली. या टिमने शोधकार्य सुरू केले. मात्र धरणात मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात अडकून टीममधील दोन सदस्य पाण्याखाली अडकून पडले होते.

यापैकी शुभम काटकर या कर्मचाऱ्याला १५ मिनिटानंतर बीडच्या बचाव पथकाने वर काढले त्यांच्यावर माजलगावच्या देशपांडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, मोरे यांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं असता डॉ. रुद्रवार यांनी मोरे यांना मयत घोषित केलं आहे. मोरे यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com