दुर्देवी घटना! भरधाव ट्रक उलटला; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

या घटनेत ट्रकमधील दोन तरुणांचा मृत्यू झाला
Beed Truck Accident
Beed Truck AccidentSaam Tv

बीड : बीड (Beed) अहमदनगर महामार्गावर एक दुर्देवी घटना घडली. महेन्द्रवाडीच्या घाटात, सामान घेऊन जाणारी ट्रक वळणावर रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पलटी (Accident) झाला. या घटनेत ट्रकमधील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. निखील दहिफळे (वय 18) नानासाहेब सानप (वय 21) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. (Beed Truck Accident)

Beed Truck Accident
सावधान! पावसाळ्यात ओले अंतर्वस्त्र परिधान करताय ? त्वचारोग तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

निखील आणि नानासाहेब हे दोघेही तरुण खडकवाडी ता. पाटोदा गावातील रहिवाशी होते. या घटनेने खडकवाडी गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या पाटोदा पोलिस ठाणे हद्दीत दौंडकडून येणारा ट्रक महेंन्द्रवाडीच्या घाटात आला असता, ट्रक चालकाला कॉर्नरचा अंदाज न आल्यामुळे, ट्रकवरील नियंत्रण सुटले. (Beed Latest News)

Beed Truck Accident
लग्न झाल्यानंतर ३ वर्षांनी सासूचा सुनेला नांदवण्यास नकार; दिलं धक्कादायक कारण

त्यानंतर ट्रक बाजूच्या दरीमध्ये कोसळला. या भीषण अपघातात ट्रक मधील निखील दहिफळे व नानासाहेब सानप यांचा जागीच मृत्यू झाला . दरम्यान हे मयत झालेले दोन्ही युवक अविवाहीत होते, त्यामुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com