Beed News: गुढ आवाजने गावकरी हैराण; भीतीतून रात्र घराबाहेर काढली जागून

गुढ आवाजने गावकरी हैराण; भीतीतून रात्र घराबाहेर काढली जागून
Beed News
Beed NewsSaam tv

बीड : बीडच्या परळी तालुक्यातील परचुंडी मलनाथपुर परिसराला वारंवार अचानक जमिनीतुन गुढ आवाज येत आहेत. या गुढ आवाजाने (Beed News) नागरीक हैराण झाले आहेत. शिवाय मनात भिती देखील निर्माण झाली असून या भीतीतून नागरीकांना रात्र जागूनच काढावी लागत आहे. (Live Marathi News)

Beed News
Accident: बहिणीला माहेरी नेत असताना अपघात; मामा– भाचीचा मृत्‍यू

परळीच्या (Parali) परचुंडी मलनाथपुर परिसराला गेली चार दिवसांपासून जमीन गुढ आवाजाने हादरत आहे. यामुळे भिंतीला तडे व पत्र्याचा आवाज आला असल्याचे या भागातील नागरिक सांगत आहेत. त्यामुळे गावकरी गेली चार दिवसांपासून रात्र घराबाहेर उघड्यावर जागून काढत आहेत.

दिवाळीत नागरिक घराबाहेर

भिंतीला तडे जाण्याच्या व पत्रे हादरल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन दिवाळीत (Diwali) नागरिकांना घराबाहेर रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. भूगर्भ तज्ञांनी सखोल तपासणी करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com