Manjra Dam: मांजरा धरणातील पाणीसाठा दररोज होतोय कमी; भर पावसाळ्यात पाणी संकट ओढावणार?

Beed News : मांजरा धरणातील पाणीसाठा दररोज होतोय कमी; भर पावसाळ्यात पाणी संकट ओढावणार?
Manjra Dam
Manjra DamSaam tv

बीड : बीड जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील (Manjra Dam) मांजरा धरणातील पाणीसाठा (Beed) धपाट्याने कमी होत आहे. भर पावसाळ्यात पाणीसाठा कमी होत असल्याने बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मोठं पाणी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Tajya Batmya)

Manjra Dam
Maval News : भात शेतीतून बाप्पाला प्रदक्षिणा; पिकात वाढ होत असल्याची शेतकऱ्यांची भावना

जवळपास गेल्या २ महिन्यांपासून बीड जिल्ह्यात पाऊस नाही. यामुळे जिल्ह्यातील धरणे कोरडे पडत आहेत. तर नद्या आजही ओस पडलेल्या आहेत. यामुळे पुढील काही दिवसात (Rain) पाऊस पडला नाही तर मोठं पाणी संकट बीड जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. मुळात बीड. लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बीडच्या केज तालुक्यातील धनेगावच्या मांजरा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याचं समोर आलं आहे. 

Manjra Dam
Erandol Accident News : महामार्गावर उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

धरणात २३.९८ टक्के पाणीसाठा 

मांजरा धरणात गेल्या ३ दिवसांपूर्वी २४.४८ टक्के असणारा पाणीसाठा आज घडीला २३.९८ टक्क्यांवर आला असून अवघ्या ३ दिवसात तब्बल .५४ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळे भर पावसाळ्यात पाणीसाठा कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात असून बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट ओढवण्याचं चित्र निर्माण झाले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com