Beed News: नगरपालिकेच्या इमारतीवरून उडी मारून आत्‍मदहनाचा प्रयत्‍न; रखडलेल्या कामासाठी संतप्‍त तरुणाचे पाऊल

नगरपालिकेच्या इमारतीवरून उडी मारून आत्‍मदहनाचा प्रयत्‍न; रखडलेल्या कामासाठी संतप्‍त तरुणाचे पाऊल
Beed News
Beed NewsSaam tv

बीड : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यात दोन टर्मपासून असलेल्या परळी नगरपालिके विरोधात तरुणाने आक्रमक पवित्रा घेतला. शहरातील रखडलेल्या कामासाठी अनेक वेळा निवेदन देऊन आंदोलन करून दखल घेतली जात नाही. यामुळे तरुणाने नगरपालिकेच्या इमारतीवरून उडी मारून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सदर तरुणास पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्‍यामुळे होणारा अनर्थ टळला आहे. (Letest Marathi News)

Beed News
Pune News: दौंड पुन्हा हादरलं! काल सात जणांच्या हत्येचं गूढ उकललं; तिथेच आज आणखी एक मृतदेह आढळला

राहुल घोबाळे असं त्या तरुणाचे नाव आहे. परळी येथील भीमवाडी या भागात ९ वर्षांपूर्वी बौद्ध विहाराचे काम सुरू केले आहे. हे काम अद्याप पुर्ण केले नसल्यामुळे वारंवार जिल्हाधिकारी कार्यालय, परळी नगरपरिषदेला निवेदन, उपोषण केली. मात्र याचा कुठे विचार प्रशासन करत नसल्याचा आरोप करत राहुल घोबाळे याने परळी परळी पालिकेच्या इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.

पोलिसांनी गेटवरच अडविले

सदर तरुण हा दिलेल्‍या इशारानुसार आत्‍मदहनासाठी नगरपालिका आवारात येत होता. मात्र नगर पालिकेच्या गेटवरचं या युवकास परळी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे आतातरी परळी नगरपालिका प्रशासन या प्रकरणाला किती गांभीर्याने घेते? हे पाहणं महत्वाच असणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com