परळीत पालिका फलकावरून मराठी आणि उर्दू भाषिक आमने-सामने

बीडच्या परळी (Parali Muncipal Corporation) येथील नगर पालिकेवर उर्दू भाषेतील फलक लावा.
परळीत पालिका फलकावरून मराठी आणि उर्दू भाषिक आमने-सामने
परळीत पालिका फलकावरून मराठी आणि उर्दू भाषिक आमने-सामनेविनोद जिरे

बीडच्या परळी (Parali Muncipal Corporation) येथील नगर पालिकेवर उर्दू भाषेतील फलक लावा. ही मागणी एमआयएम च्या वतीने केल्यानंतर, आता पालिकेवर उर्दू भाषेतील फलक नको. ही मागणी घेऊन परळीत मराठी भाषिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज परळी नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत पालिकेतंच प्रचंड घोषणाबाजी केली आहे.

यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, की नगर पालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून ही कोण्या एका धर्माशी संबंधित नाही. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषा ही मातृभाषा असून याच भाषेत सरकारी कार्यालयातील फलकावर नाव असणे अपेक्षित आहे. इतर कोणत्याही भाषेत कार्यालयावर फलक लावण्यात येऊ नये.

परळीत पालिका फलकावरून मराठी आणि उर्दू भाषिक आमने-सामने
26 वर्षीय तरुण स्वखर्चातून चालवतोय कोविड सेंटर! ; अद्याप एकही 'मृत्यू' नाही

मात्र परळी नगर पालिकेसमोर काही दिवसांपूर्वी एमआयएमचे कडून पालिकेवर उर्दू भाषेत फलक लावण्या बाबत सलग 4 दिवस आमरण उपोषण केले होते. तर काल हे उपोषण मागणी पूर्ण करू म्हणून सोडण्यात आले होते. या विरोधात आज परळीमध्ये मराठी भाषिकांनी याचा विरोध केला आहे. याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. यामुळं पालिकेवरील नावाच्या मागणीवरून उर्दू नामक फलकाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान स्थानिक प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com