समृद्धी जीवन मल्टिस्टेट घोटाळा प्रकरणात बीड पोलिसांनी महेश मोतेवारला ठोकल्या बेड्या!

महेश मोतेवारने आम्हाला फसवलं म्हणत पैसे गुंतवणूकदार महिला ढसाढसा रडली...
समृद्धी जीवन मल्टिस्टेट घोटाळा प्रकरणात बीड पोलिसांनी महेश मोतेवारला ठोकल्या बेड्या!
समृद्धी जीवन मल्टिस्टेट घोटाळा प्रकरणात बीड पोलिसांनी महेश मोतेवारला ठोकल्या बेड्या!विनोद जिरे

बीड : समृद्धी जीवन मल्टीस्टेट सोसायटी घोटाळा प्रकरणात, मुख्य आरोपी असणाऱ्या महेश मोतेवारला बीड शहर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. आज महेश मोतेवार याला जिल्हा न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायमूर्ती पोळ यांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे देखील पहा :

दरम्यान, महेश मोतेवार याच्या समृद्धी जीवन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून, बीड जिल्ह्यातील शेकडो एजंटच्या माध्यमातून हजारो गुंतवणूकदारांनी जवळपास 50 कोटी पेक्षा जास्त रक्कम गुंतवणूक केली आहे. मात्र, या गुंतवणूकदारांना एक रुपया देखील परत मिळाला नाही. यामुळे गुंतवणूकदार महिलांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. यावेळी एजंट महिला म्हणाल्या, की महेश मोतेवार यांनी आम्हाला जास्त पैशाचे अमिश दाखवलं. पाच वर्षात दाम दुप्पट देऊ असं सांगितलं.

समृद्धी जीवन मल्टिस्टेट घोटाळा प्रकरणात बीड पोलिसांनी महेश मोतेवारला ठोकल्या बेड्या!
Breaking : अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलावर मालकाचा अनैसर्गिक अत्याचार!

मात्र, आम्ही आज कोट्यावधी रुपये समृद्धी जीवन मध्ये भरलेले आहेत. आज लोकं समोर येऊन शिव्या घालतात, पैसे दे म्हणतात, मुलं नीट बोलत नाही, नवऱ्याने घटस्फोटाची नोटीस पाठवलीय. त्यामुळे आज आमच्या समोर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आमची एकच मागणी आहे, की आम्ही भरलेले पैसे परत मिळावेत. अशी मागणी करत असताना कोट्यावधी रुपये भरलेली महिला ढसाढसा रडली.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com