बनावट खवा तयार करणाऱ्या कंपनीवर बीड पोलिसांची धाड!

खव्या पासून तयार केलेले पेढे, बर्फी, मिठाई पदार्थ खाताय मग ही बातमी नक्की वाचा !!
बनावट खवा तयार करणाऱ्या कंपनीवर बीड पोलिसांची धाड!
बनावट खवा तयार करणाऱ्या कंपनीवर बीड पोलिसांची धाड!विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातील केज-बीडरोडवर उमरी जवळ एका बनावट खवा तयार करणाऱ्या कंपनीवर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केलीय. यात पावडर पासून खवा बनवण्यांचा गोरख धंदा सुरू असल्याचं उघडकीस आलय. यावेळी दुधाच्या पावडरमध्ये वनस्पती रुची तेल मिक्स करून, त्यापासून तयार केलेल्या खव्याचे पदार्थ, तब्बल 2 हजार 958 किलोग्राम,अंदाजे 5 लाख 37 हजार 480 रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त केले आहे. मात्र, या ठिकाणी पाहिलं तर एक लिटर दूध देखील पोलिसांना कारवाईमध्ये सापडलं नाही.

हे देखील पहा :

खवा तयार करत असताना केमिकलचा वापर करून लोकांच्या जीविताशी खेळ करत असल्याचे उघड झाले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून या ठिकाणचा तयार केलेला माल, औरंगाबाद, हैदराबाद, बेंगलोर एवढेच नाही तर इतरही परराज्यात जात असल्याचे समोर आले आहे. लोकांच्या जीविताशी खेळणाऱ्या व कारवाई करा. अशी मागणी शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी केली आहे.

बनावट खवा तयार करणाऱ्या कंपनीवर बीड पोलिसांची धाड!
Virar : ड्रममध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; दुर्गंधीमुळे घटना उघडकीस!
बनावट खवा तयार करणाऱ्या कंपनीवर बीड पोलिसांची धाड!
देहव्यापारासाठी गुजरातला जाणाऱ्या १० महिलांना नागपूर पोलिसांकडून अटक!

बीडचे एसीपी पंकज कुमावत यांना गुप्त माहिती मिळाली, की केज परिसरातील उमरी शिवारात असणाऱ्या, धनंजय चौरे यांच्या व्हर्टिकल फुड्स राधाकृष्ण कंपनीमध्ये, दुधाच्या पावडरपासून बनावट खवा तयार करून त्याची बाहेर जिल्ह्यात विक्री करीत आहेत. त्यानुसार सदर ठिकाणी छापा मारण्यासाठी फूड अँड ड्रग्सचे सहाय्यक आयुक्त सय्यद हस्मी व त्यांच्या सोबत अन्न सुरक्षा अधिकारी पथक यांना बोलून त्यांच्या मदतीने, दोन पंचासह सदर ठिकाणी जाऊन रात्री 9 वाजता छापा मारला.

बनावट खवा तयार करणाऱ्या कंपनीवर बीड पोलिसांची धाड!
विरार मध्ये तरुणावर चॉपर ने हल्ला, घटना CCTV मध्ये कैद; पहा Video
बनावट खवा तयार करणाऱ्या कंपनीवर बीड पोलिसांची धाड!
महिला पोलिसाने हात धुण्यासाठी खिडकीबाहेर काढला अन् साप चावला!

त्या ठिकाणी दुधपावडर मध्ये वनस्पती रूची तेल मिक्स करून, त्यापासून तयार केलेले खव्याचे पदार्थ संशयित वाटल्याने, अन्न सुरक्षा अधिकारी सय्यद इम्रान हस्मी, तन्मडवार यांनी सदर ठिकाणाहून 5 लाख 37 हजार 480 रुपयांचे 2 हजार 958 किलोग्राम खाद्यपदार्थ जप्त केले आहे. जप्त केलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे नमुने, सीए तपासणीसाठी पाठवण्यात आले असून कंपनी सील केली आहे. दरम्यान, या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली असून खरेदी करताना काळजी घ्यावी, अन्यथा केमिकलयुक्त दूध विरहित खवा खाल्ल्यामुळे, गंभीर आजाराला आमंत्रण मिळू शकते!

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com