Narendra Modi : ७ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेण्याचा मोदीजींचा गुण सर्वात जास्त आवडतो : प्रीतम मुंडे

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त, मी आपल्या आवाहन करू इच्छिते, अतिशय भ्रष्ट असणाऱ्या या राष्ट्रवादीच्या विळख्यातून, आपण आपल्या बीड जिल्ह्याला मुक्तीकडे नेऊ. असा सणसणीत संकल्परूपी निशाणा खासदार प्रीतम मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर साधला आहे.
Narendra Modi : ७ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेण्याचा मोदीजींचा गुण सर्वात जास्त आवडतो : प्रीतम मुंडे
Narendra Modi : ७ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेण्याचा मोदीजींचा गुण सर्वात जास्त आवडतो : प्रीतम मुंडे विनोद जिरे

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून, भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी, बीडच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह राज्य सरकारवर चांगलाच निशाना साधलाय. त्या म्हणाल्या, की आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त, मी आपल्या आवाहन करू इच्छिते, अतिशय भ्रष्ट असणाऱ्या या राष्ट्रवादीच्या विळख्यातून, आपण आपल्या बीड जिल्ह्याला मुक्तीकडे नेऊ. असा सणसणीत संकल्परूपी निशाणा खासदार प्रीतम मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर साधला आहे.

हे देखील पहा :

त्यांनी पुढे खड्ड्यावरून नाव न घेता धनंजय मुंडेंसह स्थानिक आमदारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या "कोण रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करत आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. उगीचच कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरायचं आणि आपणच काम केल्याचा आव आणायचा. याचा एक नवीन प्रयोग जिल्ह्यात सुरू झाला आहे. बातम्या काढतात, या नॅशनल हायवेचा भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न. मात्र जो रस्ता यांच्या अधीपत्त्यात येत नाही त्या रस्त्याच्या बातम्या येतात. याउलट श्रेय घेणारे आमदार भाजपचे असते तर मी समजून घेतले असते.

Narendra Modi : ७ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेण्याचा मोदीजींचा गुण सर्वात जास्त आवडतो : प्रीतम मुंडे
Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच
Narendra Modi : ७ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेण्याचा मोदीजींचा गुण सर्वात जास्त आवडतो : प्रीतम मुंडे
Beed जिल्ह्यातील निजामकालीन 389 शाळांचे होणार पुनरुज्जीवन; 70 कोटी मंजूर

मात्र, राष्ट्रवादीचे हे आमदार केंद्रात सत्ता भाजपची आणि रस्त्यावर खड्डे पडले, की म्हणतात खासदारांना विचारा आणि दुरुस्तीचा निधी आला की म्हणतात आम्ही आणला. अशा दोन्ही बाजूने बोलणाऱ्या लोकांना, जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. पुढे बोलताना खासदार मुंडे म्हणाल्या, की म्हणूनच मला मोदींजींचा सर्वात जास्त गुण आवडतो तो म्हणजे त्यांनी सात वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. जे करायचे ते सेवाभाव म्हणून करायचं प्रसिद्धीसाठी नाही करायचं हा त्यांचा गुण मला सर्वात जास्त आवडतो असं देखील त्या यावेळी म्हणाल्या.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.