Beed: गुटखा अड्ड्यावर धाड; गुटख्यासह 75 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीडच्या घोडका राजुरी परिसरात पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुटका अड्ड्यावर छापा मारला आहे.
Beed: गुटखा अड्ड्यावर धाड; गुटख्यासह 75 लाखांचा मुद्देमाल जप्त
Beed: गुटखा अड्ड्यावर धाड; गुटख्यासह 75 लाखांचा मुद्देमाल जप्तविनोद जिरे

विनोद जिरे

बीड - बीडच्या Beed घोडका राजुरी Ghodka Rajuri परिसरात पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुटका अड्ड्यावर छापा मारला आहे. या केलेल्या कारवाईत तब्बल ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

बीड- परळी महामार्गावरील घोडका राजुरी फाट्यावर, एका गोदामात गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून आज सकाळी पथकप्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे व सहकाऱ्यांनी तेथे छापा Raid टाकला. यावेळी एक ट्रक व एका टेम्पोतून गुटखा Gutkha भरून नेत असतानाच पथक तेथे धडकले. यावेळी दोन्ही वाहनांच्या Two Drivers Arrested चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Beed: गुटखा अड्ड्यावर धाड; गुटख्यासह 75 लाखांचा मुद्देमाल जप्त
नऊ महिन्यांच्या गर्भवतीसारखे झाले होते तरुणाचे पोट; डॉक्टरकडे गेल्यावर कळले...

यावेळी तब्बल ६२ लाख ७५ हजारांचा गुटख्याच्या साठा जप्त करण्यात आला आहे. तर या कारवाईत एकूण ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून मुख्य आरोपी दशरथ मुळेसह इतर २ जण फरार आहेत. या दोघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षकांच्या पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी दिली आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com