बीड राजीनामासत्र सुरूच; केजच्या पंचायत समिती सभापतींसह चार सदस्यांनी दिले राजीनामे !

आज केजच्या पंचायत समिती सभापती परीमला विश्वनाथ घुले यांच्यासह पंचायत समिती सदस्य सुलाबाई सदाशिव सरवदे, अनिता केदार आणि तानाजी पांडुरंग जोगदंड यांनी देखील राजीनामे दिले आहेत.
बीड राजीनामासत्र सुरूच; केजच्या पंचायत समिती सभापतींसह चार सदस्यांनी दिले राजीनामे !
बीड राजीनामासत्र सुरूच; केजच्या पंचायत समिती सभापतींसह चार सदस्यांनी दिले राजीनामे !SaamTv

विनोद जिरे

बीड - खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपदापासून डावलल्यानंतर, गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात, भाजप पदाधिकाऱ्यांसह, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांकडून, राजीनामासत्र सुरू झालं आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर, या राजीनामा सत्राला सुरुवात झालीय. काल एकाच दिवशी तब्बल 47 राजीनामे देण्यात आले होते. तर आज तिसऱ्या दिवशी देखील हे राजीनामासत्र सुरू आहे. Beed resignation continues; Kej Panchayat Samiti chairperson resigns

हे देखील पहा -

आज केजच्या पंचायत समिती सभापती परीमला विश्वनाथ घुले यांच्यासह पंचायत समिती सदस्य सुलाबाई सदाशिव सरवदे, अनिता भगवान केदार आणि तानाजी पांडुरंग जोगदंड यांनी देखील राजीनामे दिले आहेत.

बीड राजीनामासत्र सुरूच; केजच्या पंचायत समिती सभापतींसह चार सदस्यांनी दिले राजीनामे !
नितेश राणेंचे शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे संकेत ?

दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या राजीनामा सत्रानंतर, आज भाजप नेत्या पंकजा मुंडे या दिल्लीला गेल्या आहेत. त्या ठिकाणी त्या जे.पी.नड्डा यांची भेट घेणार असून आता यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.